टॅटू गोंदवणं आलं अंगलट! एकच सुई वापरल्याने 14 जणांना एड्सची लागण

hiv infected in uttar pradesh tattoo draw 14 people making tattoos

टॅटू गोंदवून घेणे हे आजकालच्या तरुणाईची फॅशन झाली आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता तरूणाई अंगावर टॅटू गोंदवून घेते. मात्र कोणत्या डिझाईनचा टॅटू गोंदवून घ्यावा? टॅटूची साईज, रंग कोणता असावा? टॅटू गोंदवताना दुखापत होणार नाही ना? असे अनेक प्रश्न पडतात. पण टॅटू गोंदवणाऱ्या आर्टिसकडून नीट सुरक्षा घेतली जातेय की नाही? याचा कधीच तरुणाई विचार करत नाही. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशातून समोर आला आहे. टॅटू गोंदवून घेणे उत्तर प्रदेशातल्या 14 जणांना महागात पडले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 14 जणांना टॅटूसाठी एकच सुई वापरत मृत्यूच्या दाढे ढकललं आहे.

उत्तर प्रदेशामध्ये 14 जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. यानंतर त्यांची टायफॉइड आणि मलेरियाची तपासणी केली. पण यात काही निष्पन्न झाले नाही. या 14 जणांचा ताप कमी होत नव्हता. यामुळे त्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. चाचणीत 14 जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे समोर आले, या 14 जणांची विचारपूस केली असता, त्यांनी असुरक्षित संबंध ठेवला नव्हता. मात्र 14 जणांनी एकाच टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला होता. धक्कादायक म्हणजे या टॅटू आर्टिस्टने पैसे वाचविण्यासाठी एकच सुई वापरल्याचे समोर आले. या घटनेमुळे टॅटू गोंदवणं 14 जणांच्या चांगलच अंगलट आलं आहे.

एचआयव्हीबाधित व्यक्तीला टॅटू गोंदवण्यासाठी वापरलेली सुई इतरांना वापरली तर त्या सर्व लोकांमा एड्सची लागण होऊ शकते. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी टॅटू आर्टिस्ट नव्या सुईचा वापर करतो की नाही? याची खात्री करुन घ्या. टॅटू गोंदवून घेतल्यानंतर कमीत कमी चार ते पाच तास तो टॅटू कापसाने कव्हर करा.


हेही वाचा : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 8 ऐवजी 12 ऑगस्टला होण्याची शक्यता