घरताज्या घडामोडीबापरे! HIV असूनही युवकानं फसवून केले लग्न; पत्नीला कळताच...

बापरे! HIV असूनही युवकानं फसवून केले लग्न; पत्नीला कळताच…

Subscribe

एका युवकाला HIV ची लागण झाली असताना देखील त्या युवकाचे गुपचूप लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

बऱ्याचदा फसवणूक करुन लग्न केली जातात, अशा एकना अनेक घटना येत असतात. अशीच एक घटना हरियाणामध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. एका युवकाला HIV ची लागण झाली असताना देखील त्या युवकाचे गुपचूप लग्न केल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे पत्नीला एक वर्षानंतर कळले असून तिला धक्काच बसला आहे. याप्रकरणी नवऱ्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फसवणूक, हुंडा, छळ यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

हरियाणातील एका पीडित महिलेचे मागील वर्षी कैथल येथील एका तरुणासोबत लग्न झाले होते. नंतर तिला समजले की लग्नाआधीच तिचा नवरा एचआयव्ही संक्रमित होता. मात्र, सासरच्या मंडळीनी समाजाची भीती दाखविली आणि तिला शांत बसण्यास सांगितले.

- Advertisement -

मात्र, महिलेने पोलिसांत जाऊन नवऱ्यासह सासरे, नंणद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, फसवणूक, हुंडा, छळवणूक फसवणूक विविध कलमांखाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस स्टेशन प्रभारी शीला देवी यांनी सांगितले की, ‘तक्रारीनंतर तिच्या पतीसह चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल’.

- Advertisement -

हेही वाचा – वहिनीचं दिराबरोबर लफडं, गावकऱ्यांनी पोलिसांसमोरच लावलं लग्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -