घरताज्या घडामोडीसमाजामध्ये जातीय तेढ रोखण्यासाठी सतर्क राहा, दिलीप वळसे पाटील यांच्या पोलिसांना सूचना

समाजामध्ये जातीय तेढ रोखण्यासाठी सतर्क राहा, दिलीप वळसे पाटील यांच्या पोलिसांना सूचना

Subscribe

महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष सुरु असताना आता समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यात येत होते. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि जातीय तेढ रोखण्यासाठी सतर्क राहा अशा सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील पोलिसांना दिल्या आहेत. तसेच पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस संचालक आणि आयुक्तांसोबतच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोलिसांना प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती दिली आहे. समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे. यामुळे अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा घटना कुठेही घडू नयेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना योग्य पद्धतीने हाताळण्यात येईल. कुठल्याही प्रकारची तेढ समाजामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. याबाबत स्थानिक पोलीस संबंधितांना जबाबदारीची कल्पना देतील असे वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

राज्यात लहान मोठ्या गोष्टीवरुन आंदोलन केली जात आहेत. आरक्षण संदर्भात असेल, हिंदू-मुस्लिम संदर्भात असेल, मंदिर सुरु करण्यासंदर्भात असतील असे आंदोलन करुन रस्त्यावर उतरुन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पोलीस दलाचे म्हणणे एकूण नागरिकांच्या अडचणी कशा दूर होतील याबाबत माहिती देण्यात आली आहे. १ हजार ९०० जास्त भोंगे अवैध मशिदीवर लावण्यात आले आहेत. यावर चर्चा झाली नाही. प्रामुख्याने पोलीस विभागाची जी प्रतिमा आहे. ती सुधारण्यासाठी काय काय उपाययोजना सुधारल्या पाहिजेत यावर चर्चा झाली आहे.

क्राइम कॉन्फरन्स दिवसभर चालणार आहे. सकाळच्या क्षेत्रामध्या मी सहभागी झालो. राज्यात गेल्या ३ वर्षात घडलेली गुन्हेगारी जे काही खटले दाखल झाले आहेत. त्याबाबत प्रेझेंटेशन दाखवण्यात आले आहे. भविष्यात राज्यासमोर काय काय प्रश्न असतील त्या संदर्भात गुप्तचर यंत्रनेकडूनही प्रेझेंटशन देण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : Budget Session : संसदेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी- सोनिया गांधींची भेट, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -