Holi 2021: ‘ही’ होळी आहे विशेष, ४९९ वर्षांनंतर आला अदभुत योग

holi 2021 Amazing Coincident On Holi 2021 After 499 Years
Holi 2021: ही होळी आहे विशेष, ४९९ वर्षांनतंर आला अदभुत योग

फाल्गुण मास पैार्णिमेला होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेकांसाठी होळी हा सण आनंदाचा, मुक्त रंगांची उधळण करण्याचा सण आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह देशभरात होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. पैार्णिमेच्या रात्री ‘होलीका’ दहन केल्यानंतर  दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते. यंदा २८ मार्चला ‘होलीका दहन’ करण्यात येणार असून २९ मार्चला रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. यंदाही कोरोनाचे सावट असले होळी ही खास आहे. या वेळेस होळी काही विशेष कारणांनी खास ठरली आहे. कारण ज्योतिष शास्त्रा तील जाणकारांच्या मते, यावेळी होळीला ४९९ वर्षांनी ग्रहांचा अदभुत, दुर्मिळ योग जुळून आला आहे. हे दुर्मिळ योग असा असेल हे जाणून घेऊ..

नेमका कसा आहे ‘हा’ दुर्मिळ योग

यंदाची होळी खास असण्याचे कारण म्हणजे,  तब्बल ४९९ वर्षांनी ग्रहांचा अदभुत, दुर्मिळ योग जुळून येणार आहे. २८ मार्चला पौर्णिमेच्या दिवशी  चंद्र हा कन्या राशीत प्रवेश करेल,  तर बृहस्पति आणि शनी ग्रह स्वत:च्या राशीत विराजमान असेल.  ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा असा महासंयोग १५२१ या वर्षात घडला होता. त्यामुळे यंदाच्या होळीला असा महासंयोग पुन्हा तब्बल ४९९ वर्षांनंतर घडणार आहे. रंगाचा व आनंदाचा हा सण यंदा आणखी दोन विशेष योग घेऊन आला आहे. तो म्हणजे होळीला सर्वार्थसिध्दी योग व अमृत सिध्दी योग सुध्दा असणार आहे. या दोन्ही योगांना शुभ मानले जाते.

शुभ मुहूर्त

‘होलिका दहन’ रविवार २८ मार्चला करण्यात येणार आहे. या होलिका दहनासाठी संध्याकाळी ०६ वाजून ३६ मिनिटांपासून ते ८ वाजून ५६ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहेत. तर  याचा एकूण काळ हा ०२ तास १९ मिनिटे असणार आहे. पैार्णिमा तिथीचा प्रारंभ २८ मार्चला सकाळी जवळ जवळ ०३ वाजल्यापासून सुरु होणार असून २९ मार्च रात्री १२ वाजून १५ मिनिटांपर्यंत समाप्ती होणार आहे. हिंदू धर्मानुसार होळीच्या आठ दिवसांआधी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या काळाला होलाष्टक म्हणून संबोधले जाते.  फाल्गुन शुक्ल अष्टमी ते होलिका दहनपर्यंत होलाष्टक मानला जातो. यंदा होलिका दहन २९ मार्चला होणार असल्याने  होलाष्टक २२ मार्च ते २८ मार्चपर्यंत असणार आहे. होलाष्टकमध्ये शुभ कार्य टाळण्यात येतात मात्र जन्म व मृत्यु संबंधित कार्य करण्यास शास्त्रानुसार कोणतीही हरकत नसले.

कशाला म्हणतात होलाष्टक?

Amazing Coincident On Holi 2021 After 499 Years
ही होळी आहे विशेष, ४९९ वर्षांनतंर आला अदभुत योग

हिंदू धर्मानुसार, हिरण्यकश्यपने आठ दिवस आपला मुलगा प्रल्हादवर खूप अत्याचार केले. पण विष्णु देवांची भक्त प्रल्हादवर भरपूर कृपा होती. या कृपेमुळे भक्त प्रल्हादची नेहमी हिरण्यकश्यपच्या त्रासापासून मुक्त होत होती. दरम्यान एक दिवस राक्षस राजा हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादला होळीत जाळण्याचा प्रयत्न केला. यासाठी हिरण्यकश्यपने बहिण होलिकाची मदत घेतली.  होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होत. पण भक्तप्रल्हादला जाळताना होलिका स्वत:च त्यात भस्मसात झाली. त्यादिवसापासून भारतात अनेक राज्यात ८  दिवस होळी साजरी केली जाते.