दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला संपूर्ण भारतात सण साजरा केला जातो. यंदा धुळवड 7 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. तसेच एक दिवस आधी म्हणजेच 6 मार्चच्या रात्री होलिका दहन केले जाईल. धुळवडीच्या दिवशी सर्व राग- रुसवे, भांडण विसरून एकमेकांना रंग लावतात. भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने धुळवड साजरी केली जाते.
लाठमार होळी – उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशात देखील होलिका दहन आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथील लोक होलिका दहन करुन पूजा करतात, गाणी गातात आणि गुलाल उधळून होळी साजरी करतात. उत्तर भारतात होळी 2 दिवस साजरी केली जाते. होलिका दहन पहिल्या दिवशी म्हणजेच छोटी होळीला केले जाते. दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. ज्यामध्ये लोक एकमेकांना रंग लावतात, वेगवेगळे पदार्थ खातात. मथुरा वृंदावनची होळी उत्तर भारतात खूप प्रसिद्ध आहे. या भागात धुळवड फुल आणि काठ्यांनी खेळली जाते.
होला मोहल्ला – पंजाब
पंजाबमध्ये होळीच्या एक दिवस आधी होला मोहल्ला साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने मार्शल आर्ट्स, घोडेस्वारी आणि शीख योद्ध्यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी कविता गाऊन सादर केला जातो. यानंतर संगीत, नृत्य आणि रंगांशी खेळत धुळवड साजरी केली जाते.
रंगपंचमी – महाराष्ट्र
महाराष्ट्रात होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. काही भागात होळीच्या पाच दिवसानंतर रंगपंचमी साजरी करतात. महाराष्ट्रात होळीला होलिका पेटवून पूजन केले जाते. या दिवशी होळीला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
रॉयल होळी – उदयपूर
राजस्थानातील उदयपूरमध्ये रॉयल होळी साजरी केली जाते. मेवाड राजघराण्याचा हा पारंपारिक सण आजही सुरु आहे. तिथे होळीच्या संध्याकाळी सध्याच्या संरक्षकाकडून शेकोटी पेटवून होळीच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यावेळी सजवलेले घोडे आणि शाही बँड्सची भव्य परेड काढली जाते.
हेही वाचा :