(Holi in Pakistan) इस्लामबाद : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची शहरातील एका आघाडीच्या खासगी विद्यापीठाने कॅम्पसमध्ये होळी साजरी केल्याबद्दल काही विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कॅम्पस नियमांचे उल्लंघन असल्याचा ठपका विद्यापीठाने ठेवला आहे. मात्र, विद्यार्थ्यांवरील या कारवाईवरून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी लाहोर येथील पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अल्पसंख्याक हिंदूं विद्यार्थ्यांना मारहाण करून होळी खेळण्यापासून रोखण्यात आले होते, हे उल्लेखनीय. (Holi in Pakistan : Notice to students from private university)
दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने (Dawood University of Engineering and Technology) विद्यार्थ्यांना बजावलेली केलेली नोटीस पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे माजी खासदार लालचंद मल्ही यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही होळी साजरी करण्याऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश हिंदू होते. तथापि, हे एक जुने प्रकरण असल्याचे सांगतानाच विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याचे वृत्त विद्यापीठाने फेटाळून लावले आहे.
اب ہولی کا تہوار منانا بھی جرم بن گیا ہے ؟
کیا اب یونیورسٹی میں ہولی کا تہوار منانا بھی ریاست کے خلاف ہے ؟
دائود یونیورسٹی آف انجینئرنگ اینڈ ٹیکنالوجی کراچی میں ہولی منانے والے بچوں پر ریاست مخالف نعرے بازے کرنے کہ پرچہ درج۔ اسٹوڈنٹس کو نوٹسز۔ #LUMS#گولی_کیوں_چلائی pic.twitter.com/IWJtvgyrZg— LAL MALHI (@LALMALHI) February 22, 2025
पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या धार्मिक प्रथांविरुद्ध वाढत्या द्वेषाबद्दल चिंता व्यक्त करताना लाल मल्ही यांनी, ‘होळी साजरी करणे आता गुन्हा ठरला आहे का? विद्यापीठात होळी साजरी करणे हे देशविरोधी कृत्य मानले जाते का?’ असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, विद्यापीठाने याबाबतचे स्पष्टिकरण दिले आहे. विद्यापीठ प्रशासनाची परवानगी न घेता कॅम्पसमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आळा होता. यामुळे विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी त्या उत्तरही दिले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून हिंदूंच्या सणांना काही ठिकाणी विरोध केला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. दोन वर्षांपूर्वी लाहोर येथील पंजाब विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही असाच प्रकार घडला होता. एलए कॉलेजच्या लॉनमध्ये विद्यार्थी होळी खेळण्यासाठी जमले असताना इस्लामी जमीयत-ए-तलबाच्या (IJT) विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना होळी खेळण्यापासून रोखले. हिंदू विद्यार्थ्यांनीही होळी खेळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेतली होती, असे त्यावेळी सांगण्यात आले होते, हे उल्लेखनीय.
हेही वाचा – S. Jaishankar : प्रत्येक गोष्टीसाठी भारतावर आरोप करणे हा मूर्खपणा, एस. जयशंकर यांनी बांगलादेशला खडसावले