Holi 2022 : होळीनिमित्त पनवेल ते प्रयागराज अन् मुंबई ते गोरखपूरदरम्यान विशेष ट्रेन

tran

देशभरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे मुंबई, पुणेसह विविध शहरांत राहणारे नागरिक होळीसाठी आपल्या मुळ गावी जात असतात. त्यामुळे होळी सणानिमित्त प्रयागराज गोरखपूरदरम्यान जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करता रेल्वे प्रशासनाने खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. पनवेल ते प्रयागरादरम्यान 21 मार्च ते 28 मार्चपर्यंत चार विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. तर मुंबई आणि गोरखपूर दरम्यान 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत आणखी 8 होळी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. या होळी स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –

पनवेल आणि प्रयागराज दरम्यान होळी विशेष (४ फेऱ्या)

04116 विशेष दि. २१.३.२०२२ आणि २८.३.२०२२ रोजी २२.३० वाजता पनवेल येथून सुटेल आणि प्रयागराज येथे तिसर्‍या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

04115 अतिजलद विशेष प्रयागराज येथून दि. २०.३.२०२२ आणि २७.३.२०२२ रोजी १७.२५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी २०.५० वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, एमसीएस छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कारवी, माणिकपूर, शंकरगड आणि नैनी.

संरचना: दोन तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. १९.३.२०२२ पासून विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 04116 चे बुकिंग सुरू होईल.

मुंबई आणि गोरखपूर दरम्यान आणखी ८ होळी विशेष ट्रेन

होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपूर दरम्यान आणखी ८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

गाडी क्र. 01021 होळी वविशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १४.१५ वाजता दि. १९.३.२०२२, २४.३.२०२२, २७.३.२०२२ आणि ३१.३.२०२२ (४ फेऱ्या) रोजी सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 01022 होळी विशेष गोरखपूर येथून दि. २१.३.२०२२, २६.३.२०१२, २९.३.२०२२ आणि २.४.२०२२ रोजी १४.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

थांबे: इगतपुरी, बिना, खजुराहो, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड, बनारस, मऊ, भटनी जंक्शन आणि देवरिया सदर.

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01021 साठी विशेष शुल्कासह बुकिंग कदि. १८.३.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.