घरताज्या घडामोडीदिल्लीच्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार - सोनिया गांधी

दिल्लीच्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार – सोनिया गांधी

Subscribe

काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर सोनिया गांधी यांनी आरोप केले.

सलग तीन दिवसांपासून दिल्ली हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत या हिंसाचारात २१ जणांचा बळी गेला असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीच्या हिंसाचाराला अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारुन त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली. तसंच या हिंसाचाराविरोधात केंद्राने जाणीपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप देखील काँग्रेसने केंद्र सरकारवर केला.

दिल्ली हिंसाचार हा भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे उफाळला आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. दिल्ली पोलिसांनी मागील ७२ तासात कुठलीही कारवाई केली नाही. या परिस्थितीला केंद्राच्या बरोबरीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि प्रशासनही जबाबदार आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. याबरोबर दिल्लीमधील हिंसाचारा संबंधित पाच प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले.

- Advertisement -

१) गृहमंत्री रविवारपासून कुठे होते आणि ते काय करत होते?

२) दिल्लीचे मुख्यमंत्री रविवारपासून कुठे होते आणि ते काय करत होते?

- Advertisement -

३) गुप्तहेर संघटनांनी सरकारला दिल्लीच्या निवडणूकांनंतर कोणती माहिती दिली होती? या माहितीच्या आधारावर काय कारवाई केली?

४) रविवारीच्या रात्रीपासून दंगलग्रस्त भागामध्ये किती पोलीस तैनात करण्यात आले होते?

५) दिल्लीतील परिस्थितीवर पोलिसांचे काहीच नियंत्रण राहिले नव्हते तर केंद्रीय सुरक्षा दलांना का पाचारण करण्यात आलं नाही?


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार: परिस्थिती हाताबाहेर जातेय, कर्फ्यू लावा – अरविंद केजरीवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -