घरअर्थजगतHome Loan : SBI गृह कर्जावर देतेय तीन खास ऑफर, असा घ्या...

Home Loan : SBI गृह कर्जावर देतेय तीन खास ऑफर, असा घ्या फायदा

Subscribe

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृह कर्जांसाठी विशेष ऑफर देत आहे. SBI मध्ये गृह कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना तीन अतिरिक्त फायदे मिळतील असं बँकेनं म्हटलं आहे. शून्य प्रक्रिया शुल्क, ३० लाखाहून अधिक आणि एक कोटीपेक्षा कमी गृहकर्जासाठी उच्च सीबील स्कोअर असलेल्या ग्राहकांना ०.१० टक्के व्याज सवलत आणि एसबीआय योनो App वरुन अर्ज करणाऱ्या ग्राहकांना ०.०५ ची अतिरिक्त सूट. अशाप्रकारे एसबीआय ग्राहकांना गृह कर्जावर तीन अतिरिक्त लाभ देत आहे.

कोरोना विषाणूमुळे रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करून चार टक्क्यांपर्यंत आणल्यानंतर गृह कर्जावरील व्याजदर कमी झालं आहे. एसबीआयमधील सर्व नवीन गृह कर्ज बाह्य बेंचमार्कशी जोडलेले आहेत, जे सध्या ६.६५ टक्के आहेत. एसबीआयचा ईबीआर रेपो रेटशी जोडला गेला आहे. सध्या एसबीआयचा गृह कर्जावरील व्याजदर पगारदार ग्राहकांसाठी ६.९५ ते ७.४५ टक्के आणि स्वयंरोजगार ग्राहकांसाठी ७.१० ते ७.६० टक्क्यांच्या दरम्यान आहे. एसबीआयने ग्राहकांना ट्विट करुन होम लोनवरील ऑफरबद्दल माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओ देखील आहे, ज्यामध्ये या तीन फायद्यांचं वर्णन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -