घरअर्थजगतमंदीत होणार चांदी! RBIच्या निर्णयानंतर गृहकर्ज, वाहनकर्ज होणार स्वस्त!

मंदीत होणार चांदी! RBIच्या निर्णयानंतर गृहकर्ज, वाहनकर्ज होणार स्वस्त!

Subscribe

रिझर्व्ह बँकेने देशातील इतर सर्व बँकांवर रेपो रेटनुसार कर्जधोरण ठरवण्याची सक्ती केल्यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज आणि लघुउद्योगांची बदलती कर्ज स्वस्त होणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर महिनाभर शेअर मार्केट गर्द निराशेमध्ये सापडला आहे. सामान्य गुंतवणूकदारांमध्ये नैराश्य आलेलं असताना अखेर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सामान्य भारतीयांच्या मदतीला धावून आली आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे होमलोन अर्थात गृहकर्ज, वाहनावरील कर्ज याशिवाय लघुउद्योगांनी काढलेलं कर्ज स्वस्त होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांना आपल्या व्याजदरामध्ये कपात करावी लागणार आहे. परिणामी ही कर्जे आपोआप स्वस्त होणार आहेत. दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयामुळे तरी किमान गुंतवणूकदारांमध्ये उत्साह येऊन बाजारात तेजी दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काय आहे RBIचा हा निर्णय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ही भारतातली शिखर बँक आहे. म्हणजेच दुसऱ्या शब्दांमध्ये भारतातल्या सर्व बँकांची ही ‘सीनिअर’ बँक आहे. या बँकेने अनेकदा मुख्य व्याजदरात कपात केली. मात्र, त्यानुसार इतर सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँका त्यांच्या व्याजदरांमध्ये कपात करत नव्हत्या. आता मात्र, रिझर्व्ह बँकेने देशातल्या सर्व बँकांना मुख्य व्याजदरासोबत, रेपो रेट सोबत आपलं व्याजदर धोरण संलग्न करण्याची सक्ती केली आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेच्याच व्याजदरानुसार या बँकांना आपले व्याजदर निश्चित करावे लागणार आहेत.

- Advertisement -

हा व्हिडिओ पाहिलात का? – आर्थिक मंदीतून वाचण्यासाठी हा व्हीडीओ नक्की बघा

फक्त फ्लोटिंग कर्जांसाठीच फायदा!

दरम्यान, आरबीआयच्या या निर्णयाचा लाभ फक्त फ्लोटिंग लोन अर्थात बदलत्या कर्ज सुविधा धारकांनाच मिळणार आहे. ज्यांनी फिक्स्ड इएमआय अंतर्गत कर्ज घेतलं आहे, त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळेच आता रिझर्व्ह बँकेने मुख्य व्याजदरात कपात केल्यास बदलती कर्ज घेतलेल्या नागरिकांना याचा फायदा होईल. नागरिकांना भरावा लागणारा हफ्ता कमी होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -