घरCORONA UPDATECorona: अमित शहा यांना AIIMS मधून लवकरच मिळणार डिस्चार्ज

Corona: अमित शहा यांना AIIMS मधून लवकरच मिळणार डिस्चार्ज

Subscribe

अमित शहा ठणठणीत बरे झाले असून त्यांच्यावर कोरोनापश्चात उपचार सुरु होते. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे, असे एम्सकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यावर मात करून ते घरी परतले होते. परंतु घरी गेल्यानंतर रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे एम्स रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. अमित शहा ठणठणीत बरे झाले असून त्यांच्यावर कोरोनापश्चात उपचार सुरु होते. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे, असे एम्सकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, १७ ऑगस्टला रात्री अमित शहांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यामुळे त्यांना रात्रीच एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. २ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर १४ ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.

मिळालेल्या माहिती नुसार, कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं ट्विट देखील केले होते.


धार्मिक स्थळे उघडण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -