घरताज्या घडामोडीकलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडित मारले गेले? गृहमंत्रालयाने दिले उत्तर

कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडित मारले गेले? गृहमंत्रालयाने दिले उत्तर

Subscribe

राज्यसभेत बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने खोऱ्यात कलम 370 हटवल्यानंतर किती काशिरी पंडित मारले गेले याबाबत माहिती दिली आहे. दहशतवादी घटनांमध्ये अल्पसंख्यांक समुदायातील 34 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यसभेत गृराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी माहिती देताना सांगितले की, 5 ऑगस्ट 2019 ते चालू वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 5 काश्मिरी पंडित आणि 10 हिदूंची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. आता पुन्हा दहशतवाद्यांकडून इतर राज्यांतून आलेले मजूर आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांना लक्ष्य करण्यात येत आहे. सोमवारीच दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित बाल कृष्ण यांच्यावर हल्ला केला आहे. तर पंजाब आणि बिहारमधील 4 मजुर दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.

राज्यसभेत गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात सांगितले की, अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी सरकारने काश्मीर खोऱ्यात अनेक उपाययोजना केल्या आहेत. मजबूत सुरक्षा आणि गुप्तचर ग्रिड, स्टॅटिक गार्ड्सच्या रूपात सामूहिक सुरक्षा, क्षेत्रावर रात्रंदिवस वर्चस्व, नाक्यांवर 24 तास तपासणी आणि अल्पसंख्यांक लोक राहत असलेल्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच दहशतवाद रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

- Advertisement -

दरम्यान आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये सीमापार घुसखोरीमध्ये 2018 पासून सातत्याने घट झाली आहे.2017 मध्ये 136 वेळा, 2018 मध्ये 143 वेळा, 2019 मध्ये 138 वेळा, 2020 मध्ये 51 वेळा आणि 2021 मध्ये 34 वेळा घुसखोरी झाली होती असे गृहाज्यमंत्र्यांनी सांगितले. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने उच्च स्तरीय दृष्टिकोण स्वीकारला आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर बहु-स्तरीय तैनाती, सीमेवर कुंपण घालणे, गुप्तचर आणि ऑपरेशनल समन्वय सुधारणे, सुरक्षा दलांना आधुनिक शस्त्रे प्रदान करणे आणि घुसखोरांविरुद्ध सक्रिय कारवाई करणे यांचा समावेश करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरेंसचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. दहशतवादी घटनांची संख्या 2018 मध्ये 417 वरून 2019 मध्ये 255 झाली. 2020 मध्ये 244 आणि 2021 मध्ये 229 झाली. मे 2014 ते 4 ऑगस्ट 2019 दरम्यान 177 नागरिकांचा मृत्यू झाला तर 406 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. 5 ऑगस्ट 2019 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान, 87 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 99 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. तसेच अशी माहिती देण्यात आली आहे की, कलम 370 रद्द केल्यानंतर, सुमारे 2105 स्थलांतरित पंतप्रधान विकास पॅकेज अंतर्गत प्रदान केलेल्या नोकऱ्या घेण्यासाठी काश्मीर खोऱ्यात परतले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Fuel Price Hike : वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचं आज देशभरात आंदोलन; हजारो कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -