घरताज्या घडामोडीम्हणूनच अदार पूनावालांना केंद्राने दिली Y दर्जाची सुरक्षा

म्हणूनच अदार पूनावालांना केंद्राने दिली Y दर्जाची सुरक्षा

Subscribe

Serum Institute India (SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज बुधवारी (Y security) वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एस्ट्रेजेनिकासोबतच देशात सर्वात मोठी वॅक्सिन निर्मात्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अदार पूनावाला यांच्या सुरक्षेसाठीची जबाबदारी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे. आजच अदार पूनावाला यांनी राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या लसीमध्ये १०० रूपयांची कपात करत ही लस आता ३०० रूपयांना देण्यात येईल असे ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

- Advertisement -

गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार अदार पूनावाला यांच्या सुरक्षेत केंद्रीय राखील सुरक्षा बल (CRPF) च्या माध्यमातून सुरक्षा देण्यात येईल. पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) मध्ये सरकार आणि नियमन विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहून पूनावाला यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसारच केंद्राने हा निर्णय घेतला आहे. भारतात दिल्या जाणाऱ्या Covid-19 विरोधी लसींपैकी एक लस म्हणजे कोविशील्डची निर्मिती सीरममार्फत करण्यात येत आहे. पण सीरम इंस्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांना अनेक गटांकडून धमकी मिळत असल्याचा उल्लेख सीरमकडून लिहिण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे. सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात हेदेखील नमुद करण्यात आले होते की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेजस्वी नेतृत्वामध्ये भारत सरकारच्या खांद्याशी खांदा जोडून कोरोना विरोधातील लढाई लढत आहोत.

वाय दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत एकुण ११ जणांच्या सुरक्षा रक्षकांची टीम आता अदार पूनावाला यांच्यासाठी नेमण्यात आली आहे. त्यामध्ये एक ते दोन कमांडोदेखील असतील. देशभरात सर्व ठिकाणी हे सिक्युरीटी कव्हर असेल. देशभरात कोरोना विरोधातील लढाईत लढणाऱ्या महत्वाच्या अशा व्यक्तींपैकी एक असे आहेत. म्हणूनच त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसेच अदार पूनावाला यांना मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा देण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेतला आहे. सीरमकडून महाराष्ट्राला मे महिन्यामध्ये एकुण १ कोटी डोस देण्यात येणार आहेत, अशी माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशात सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीच्या किंमतीमुळे चर्चा आहे. त्यामध्येच आज सीरमचे अदार पूनावाला यांनी ट्विट करत १०० रूपयांनी लसीची किंमत कमी करत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे याआधी राज्य सरकारला जी लस ४०० रूपयांना मिळणार होती, ती लस आता ३०० रूपयांना मिळेल असेही पूनावाला यांनी ट्विटमध्ये नमुद केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ अशा पद्धतीने होईल. तसेच राज्य सरकारचे कोट्यावेधी रूपये यामुळे वाचतील. परिणामी अधिकाधिक लसीकरण होणे शक्य होईल आणि अनेक जीवदेखील यामुळे वाचू शकतील असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -