डिजिटल सर्व्हिस देण्यात गृह मंत्रालय आघाडीवर; वेबसाईटला मिळाले पहिले स्थान

home ministry website top of providing mational e governance service delivery digital police portal

देशातील नागरिकांना डिजिटल सेवा पुरविण्यात गृह मंत्रालय आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या (DARPG) अहवालानुसार, गृह मंत्रालयाच्या वेबसाईटने 2021 मध्ये जास्तीत जास्त लोकांना डिजिटल सुविधा दिल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस पोर्टल आहे.

देशातील ई- गव्हर्नन्स सेवा तपासण्यासाठी DARPG ने त्याच्या नॉलेज पार्टनर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (NASSCOM) आणि केपीएमजीसोबत मिळून 2021 मध्ये डिजिटल आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या विभागांच्या वेबसाईट्सचे मूल्यमापन केले. या एक्सर्साइजमध्ये सेवा पोर्टलचे मूल्यांकन करण्यात मूळ मंत्रालय आणि विभाग सर्विस पोर्टलचा समावेश होता. गृह मंत्रालयाच्या वेबसाइटला या मूल्यांकनात प्रथम स्थान मिळाले आहे.

मूल्यमापनासाठी गृह मंत्रालयाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ची वेबसाइट https://digitalpolice.gov.in/ सेवा पोर्टल म्हणून आणि गृह मंत्रालयाची मुख्य वेबसाइट https:// mha.gov.in ही मूळ मंत्रालय पोर्टल म्हणून शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. मूल्यांकन केलेल्या सर्व सरकारी पोर्टल्सना प्रथम दोन मुख्य श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते ज्यात पहिल्या श्रेणीत राज्य, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालयाचे पोर्टल आणि दुसऱ्या श्रेणीत राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालय सेवा पोर्टल शॉर्टलिस्ट करण्यात आले होते.

चार पॅरामीटर्सवर केले मूल्यांकन

सेवेची सुलभता, सेवेची उपलब्धता, सेवेची वापर सुलभता, सेवेची माहिती, सुरक्षितता आणि प्रायव्हेसी या चार मुख्य बाबींच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. केंद्रीय मंत्रालयाने सेवा पोर्टल श्रेणीसाठी तीन अतिरिक्त मापदंड देखील वापरले होते, ज्यात शेवटचे सेवा तपशील, एकात्मिक सेवा तपशील आणि त्याची स्थिती आणि रिक्वेस्ट ट्रॅकिंग यांचा समावेश आहे.


संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषण करण्यास बंदी; धार्मिक कृतींनाही मनाई