Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Treatment: घरगुती उपायांनी रुग्णांची कोरोनामुक्ती शक्य, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप...

Corona Treatment: घरगुती उपायांनी रुग्णांची कोरोनामुक्ती शक्य, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे अनेक लोकं घरीच ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिवीर इंजेक्शनचा घरीच साठा करत आहे आणि यामुळे तुटवडा भासत आहे. पण कोरोनाचा रुग्णाला हे सगळं करण्याची गरज नाही घरगुती उपायांनी देखील रुग्ण कोरोनामुक्त होणे शक्य आहे, असा विश्वास एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.

नेमके काय म्हणाले डॉ. रणदीप गुलेरिया?

सर्व प्रथम कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाले तर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण आहे. या भितीमुळे अनेक लोकांनी घरात इंजेक्शन ठेवले आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन सिलिंडरचा साठा घरीच केला जात आहे. यामुळे तुटवडा भासत आणि भितीचे आणखीन वातावरण निर्माण होत आहे. कोरोना व्हायरस हा सामान्य संसर्ग आहे. ८५ ते ९५ टक्के लोकं यांना साधा ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत आहेत. अशा रुग्णांना जास्त ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि औषधांची गरज भासत नाही. तापाची गोळी घ्या, सर्दी-खोकल्याचे औषध घ्या, घरगुती उपाय करा, वाफ घ्या, योगा करा अशानेच तुम्ही ठीक व्हाल. मग तुम्हाला ना घरी ऑक्सिजन ठेवण्याची गरज नाही ना रेमडेसिवीर ठेवण्याची गरज नाही. आरामात आठवड्यात किंवा १० दिवसात बरे व्हाल, असा विश्वास डॉ. रणदीप गुलेरिया व्यक्त केला आहे.

रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही – रणदीप गुलेरिया

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, ‘यामध्ये पण १० ते १५ टक्के असे लोकं आहेत, ज्यांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. तसेच ५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना व्हेटींलेटरची गरज भासत आहे. पूर्ण आकडेवारी पाहिली तर काही घाबरायची गरज नाही आहे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि जर रुग्णालयात दाखल होऊन लगेच ऑक्सिजन सुरू केले तर हे चुकीचे आहे. यामुळेच ऑक्सिजनचा तुटवडा भासेल. फक्त १० ते १५ टक्के रुग्ण गंभीर असू शकतात. जे रुग्ण घरी आहेत, ज्यांची ऑक्सिजन पातळी व्यवस्थित आहे. अशा रुग्णांना रेमडेसिवीरची गरज नाही आहे आणि जर रेमडेसिवीर घेतले असेल तर नुकसान होऊ शकते. रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही.’


हेही वाचा – Maharashtra Corona Update: कडक लॉकडाऊन ठरला असरदार! आज राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट


- Advertisement -