घरCORONA UPDATE'Honda From Home' आता घरबसल्या बुक करा होंडाची कार!

‘Honda From Home’ आता घरबसल्या बुक करा होंडाची कार!

Subscribe

ग्राहकांना ऑनलाईन गाडी खरेदीचाही अनुभव घेता येणार आहे.

सध्या देशात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे सगळेच वर्क फ्रॉर्म होम करत आहेत. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सगळी दुकानं बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आता ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडला आहे. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ग्राहकांनी ऑनलाईन सोनं खरेदी केल्या नंतर आता ग्राहकांना ऑनलाईन गाडी खरेदीचाही अनुभव घेता येणार आहे. देशातील आघाडीची ऑटो कंपनी, होंडा कार्स इंडिया लिमीटेडने (HCIL) ‘होंडा फ्रॉम होम’ या ऑनलाइन बूकिंग प्लॅटफॉर्मची सुरूवात केली आहे.

- Advertisement -

होंडाच्या या आयडीयाच्या कल्पनेमुळे ग्राहकांना डीलरशीपमध्ये न जाता घरबसल्या आपली आवडती कार खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना त्यांची आवडती डीलरशीप निवडणे आणि ऑनलाइन त्यांची कार बूक करणे यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या कारचं बूकिंग घरून आरामात करू शकतात.

घरबसल्या करा कार बुक

होंडा कार्स इंडिया लिमीटेडचे विक्री आणि विपणनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक राजेश गोयल म्हणाले की, “आमची नवीन ‘होंडा फ्रॉम होम’ सुविधा ग्राहकांना ऑनलाइन खरेदीचा सोपा आणि सुरक्षित अनुभव देते. ग्राहक आता सोयीस्करपणे त्यांची होंडा कार त्यांच्या घरूनच बूक करू शकतात. हा प्लॅटफॉर्म होंडाच्या डीजिटलीकरणाचा एक भाग आहे, ”

- Advertisement -

अशी बूक करा होंडाची कार 

– www.hondacarindia.com ला लॉग ऑन करा

– बूक नाऊ हा पर्याय निवडा

– मॉडेल निवडा

– तुमची डीलरशीप निवडा

– तुमची माहिती द्या

– ऑनलाइन बूक करा आणि पेमेंट करा

– ग्राहकाच्या मागणीनुसार खरेदी केलेल्या कारची होम डिलिव्हरीची व्यवस्थाही केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -