घरदेश-विदेशहनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा लग्नाच्या 13 वर्षांनंतर घटस्फोट; अडीच वर्षांनंतर...

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा लग्नाच्या 13 वर्षांनंतर घटस्फोट; अडीच वर्षांनंतर कोर्टाने दिली मंजुरी

Subscribe

प्रसिद्ध रॅपर हनी सिंगचा घटस्फोट मंजूर झाला आहे. 7 नोव्हेंबर रोजी दिल्ली न्यायालयाने सिंगर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. आता या दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत.

मुंबई: प्रसिद्ध रॅपर हनी सिंगचा घटस्फोट मंजूर झाला आहे. 7 नोव्हेंबर रोजी दिल्ली न्यायालयाने सिंगर हनी सिंग आणि त्याची पत्नी शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. आता या दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत. शालिनीने हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. पण आता घटस्फोटानंतर अभिनेत्याला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. त्याला पत्नीला पोटगी म्हणून करोडो रुपये द्यावे लागणार आहेत. (Honey Singh and Shalini Talwar divorce after 13 years of marriage After two and a half years the court gave approval)

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा विवाह 23 जानेवारी 2011 रोजी झाला होता. आणि आता 12 वर्षांनंतर ते वेगळे झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वीच कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी देण्यापूर्वी, हनी सिंगला विचारले की त्याला शालिनीसोबत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे का, त्यावर हनी सिंग म्हणाला की आता काही अर्थ नाही. कारण आता आम्ही एकत्र राहू शकत नाही. त्याचवेळी शालिनीनेही होकारार्थी उत्तर दिलं आणि त्यानंतर कोर्टाने निर्णय दिला.

- Advertisement -

हनी सिंग पोटगी देणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनी सिंग आणि शालिनी सिंग यांनी घटस्फोटादरम्यान एकमेकांवर केलेले सर्व आरोप आणि प्रति-आरोपही मागे घेतले आहेत. शालिनीने हनी सिंगकडून पोटगीसाठी 10 कोटी रुपये मागितले होते. ती रक्कम आता 1 कोटीवर आली आहे. या रकमेबाबत दोघांमध्ये करार झाला आहे.

हनी सिंगची मैत्रीण

हिरदेश सिंग म्हणजेच यो यो हनी सिंग या नावाने त्यांची ख्यातील आहे. त्याने डिसेंबर 2022 मध्ये एका कार्यक्रमात त्याची गर्लफ्रेंड टीना थडानी सोबत त्याचे नाते अधिकृत केले होते. ‘बॉलिवुड हंगामा’ सोबतच्या संभाषणादरम्यान, रॅपरने मित्रांद्वारे टीना थडानीला कसा भेटलो हे उघड केले. टीना थडानी हनी सिंगच्या नवीन गाण्यात ‘परीस का ट्रिप’मध्ये दिसली होती. टीना थडानी ही कॅनेडियन अभिनेत्री आणि मॉडेल असून ती आता मुंबईत राहते. ती एक चित्रपट निर्माता देखील आहे, तिने ‘द लेफ्टओव्हर्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -