कोरोना विरोधात हॉंककाँग हे एक आदर्श मॉडेल

एकेकाळी कोरोनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चीनच्या वूहान शहरापासून अवघ्या ९१९ किलोमीटर दूर हॉंगकॉंगमध्ये लॉकडाऊन नाही.

कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधून समोर आले होते. काही दिवसात हा व्हायरस जगभरात पसरला. त्यामुळेच जगभरात लॉकडाऊन घोषित करावे लागले. परंतु, एकेकाळी कोरोनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चीनच्या वूहान शहरापासून अवघ्या ९१९ किलोमीटर दूर हॉंगकॉंगमध्ये लॉकडाऊन नाही. तरीही या शहरात कोरोना नियंत्रणात आहे. काही ठिकाणी ठराविक निर्बंध येथे सर्व काही सुरळीत सुरू आहे. ७४ लाख लोकसंख्या असलेल्या हॉंककाँगमध्ये सध्या लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आले आहे. त्यामुळे हॉंककाँगचे उदाहरण जगभरात दिले जात आहे. एप्रिल महिन्यात एक जर्नल ‘द लँसेट’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, नॉन फार्मासिटीकल इंटरव्हेशन जसे की, सीमा प्रतिबंध, क्वारंटाईन, आयसोलेशन, डिस्टन्सिंग आणि लोकांच्या वागण्यातील बदल यामुळे कोरोनाचा फैला रोखण्यात हॉंककाँग यशस्वी ठरले. कोरोना विरोधात हॉंककाँग हे एक आदर्श मॉडेल मानले जात आहे.

मूळचे जयपूरचे राहुल गांधी गेल्या ७ वर्षांपासून हॉंककाँगमध्ये आहेत. ते केजीके ग्रुपमध्ये काम करतात. यावेळी गांधी म्हणाले की, २००२ साली सिव्हीअर अक्युट रेस्पिरेटरी सिड्रोम (सार्स) ने चीनवर हल्ला चढवला होता. त्यावेळी लोक व्हायरसपासून बचाव करण्याची पद्धत शिकले होते. तीच आता कमी येत आहे. याठिकाणी सरकार लोकांना समजावून सांगण्याची गरज पडलेली नाही. लोकांना स्वतः याची जाणीव होती. चीनमध्ये व्हायरसचा पत्ता लागताच हॉंककाँगने सीमा सील केल्या होत्या. चीनमध्ये ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली. भारतात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण याठिकाणी लोकांना माहिती ही सरकारकडूनच दिली जाते, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली.

हॉंककाँगमध्ये राहणारे हेमंत त्रिपाठी सांगतात की, येथे बहुतांश लोक मास्क वापरतात. मास्क शिवाय कुणीही दिसत नाही. अधिक गर्दी असलेल्या ठिकाणी सुरुवातीपासूनच मास्क वापरताना दिसून येतात. पहिल्या दिवसापासून येथे सक्तीचे नियम पाळण्यात आले. आता लोक मेट्रोमधून बिनधास्त प्रवास करत आहेत. ते केवळ मास्क वापरून वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ धुतात. लिफ्ट किंवा कोणत्याही सार्वजनिक गोष्टीचा वापर करताना टिशू पेपर वापरतात. हे टिशू पेपर इकडे तिकडे फेकून दिले जात नाही.

भारतात अँप लॉन्च करण्यात आले होते. पण हॉंककाँगमध्ये ते आधी पासून करण्यात आले आहेत. प्रत्येकाने ते डाऊनलोड केले होते. सरकारने तंत्रज्ञाचा पुरेपूर वापर केला. क्वारंटाईनमध्ये लोकांच्या हातात बँड बांधण्यात आले होते. त्यामध्ये जीपीएस आणि अत्याधुनिक ट्रेकिंग सिस्टीम होते. यातून लोक कुठे आहेत याची माहिती सरकारला मिळत होती. विमानतळ, बंदरे लगेच बंद करण्यात आली. तसेच शाळा, क्लब, जिम आणि पार्लर सुद्धा बंद करण्यात आली होती. पण, पूर्णपणे लॉकडाऊन कधीच लागू करण्यात आला नाही, असेही हेमंत यांनी सांगितले.