घरदेश-विदेशभयंकर; बायकोला ठार करुन कवटीचं केलं सूप...

भयंकर; बायकोला ठार करुन कवटीचं केलं सूप…

Subscribe

 

नवी दिल्लीः हॉंगकॉंग येथे एका प्रसिद्ध मॉडलची हत्या करण्यात आली. या हत्येचा तपास करताना पोलिसही चक्रावून गेले. कारण त्या मॉडलचा मृतदेह सापडत नव्हता. मृतदेह सापडल्यानंतर तिचं शीर गायब होतं. तिच्या कवटीचं सूप बनवून एका पॉटमध्ये ठेवलं होतं. त्यात गाजर आणि मुळा म्हणून तिच्या डोक्याची कातडी टाकली होती. हा किळसवाणा प्रकार बघून पोलिसही थक्क झाले.

- Advertisement -

एबी चोई ह्या २८ वर्षीय मॉडलचा घटस्फोट झाला होता. मालमत्तेवरून तिचा पती आणि त्याच्या कुटुंबियांसोबत वाद सुरु होता. २१ फेब्रुवारीला ही मॉडल अचानक गायब झाली. पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. हॉंगकॉंग शहरातील एक घरामध्ये तिचा मृतदेह सापडला. तिच्या शरीराचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले होते. मात्र तिचे शीर पोलिसांना सापडत नव्हते. पोलिसांनी शीर शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरामध्ये टेबलवर ठेवलेल्या पॉटमध्ये सुप असल्याचे पोलिसांनी दिसले. त्या सुपमध्ये जे तरंगत होते ते बघून पोलीस थक्क झाले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला तर धक्कादायक माहिती समोर आली. मॉडलच्या कवटीचं सुप बनवून त्यात टेवण्यात आलं होतं. गाजर आणि भाज्या म्हणून त्यात कवटीची कातडी ठेवण्यात आली होती. त्या घरात इलेक्ट्रिक करवत, मांस कापण्याचे मशीन आणि काही कपडे सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मॉडलच्या पतीला अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या घटनेमुळे श्रद्धा वालकर हत्याकांडाची चर्चा सुरु झाली आहे. श्रद्धा आणि आफताब एकाच कंपनीत काम करायचे. त्यामुळे दोघांचं प्रेम जुळलं आणि ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायला लागले. लग्नाच्या कारणावरुन दोघांमध्ये भांडण व्हायची. एके दिवशी आफताबने श्रद्धाचा खून करुन तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीत त्याने तिची हत्या झाली. पोलिसांनी आफताबला अटक केली. दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात ६ हजार ६३६ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात आरोपी आफताबवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -