घरदेश-विदेशसमुद्रात महाकाय जहाजाचे झाले दोन तुकडे, पाहा थरारक रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडीओ

समुद्रात महाकाय जहाजाचे झाले दोन तुकडे, पाहा थरारक रेस्क्यु ऑपरेशनचा व्हिडीओ

Subscribe

हॉंगकॉंगच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असताना चक्रीवादळात हे जहाज अडकलेले , वादळी वारा, बेफाम लाटांमुळे या जहाजाचे अक्षरश: दोन तुकडे झाले

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे. हा व्हिडीओ दक्षिण चीन समुद्रातील टायफून चाबादरम्यान बुडणाऱ्या जहाजाचा आहे. शनिवारी हॉंगकॉंगच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असताना चक्रीवादळात हे जहाज अडकलेले , वादळी वारा, बेफाम लाटांमुळे या जहाजाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. या जहाजातून ३० जण प्रवास करत होते. पण वादळामुळे जहाजाचे दोन तुकडे झाले आणि २७ जण एका क्षणात पाण्यात फेकले गेले. तर यातील तीनजणांनी कसाबसा जहाजाच्या तुटलेल्या एका भागावर चढत जीव वाचवला. त्याच क्षणाचा काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ आहे.

- Advertisement -

यावेळी रेस्क्यु टिमने तुटलेल्या आणि पाण्यात बुडत असलेल्या जहाजावरील या कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरने रेस्क्यु केले. त्यातील एका कर्मचाऱ्याला एअर लिफ्ट करतानाचा हा थरारक व्हिडीओ आहे. हॉंगकॉंग सरकारने त्यांच्या फ्लाईंग सर्विसच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. चीनमध्ये सध्या मुसळधार पाऊस, चक्रीवादळ आणि पुराने थैमान घातले आहे. चीनच्या इतिहासात पहील्यांदाच पावसाचा असा कोप झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -