Gujarat Accident | अहमदाबाद – गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात शनिवारी सकाळ-सकाळीच मोठा अपघात घडला आहे. बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस समोरून येणाऱ्या एसयुव्ही कारला जाऊन धडकली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून २८ पेक्षा अधिक जण जखमी असल्याचे वृत्त आहे. यापैकी अनेकांची परिस्थिती गंभीर आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पहाटे पाच वाजता हा अपघात घडला. चालत्या गाडीत बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या कारला धकड बसली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २८ पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत. अपघातानंतर ११ जणांना नवसारी येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, १७ जणांना वलसाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी प्रवाशांवर सूरतच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Gujarat | Several people injured in a collision between a bus and a car in Navsari. Injured admitted to hospital. More details awaited. pic.twitter.com/AFUabv1dSB
— ANI (@ANI) December 31, 2022
नवसारीचे पोलीस अधिक्षक ऋषिकेश उपाध्याय यांनी सांगितलं की, हा अपघात मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वेसमा गावाजवळील घडला. या मार्गावरून बस वलसाड येथे जात होती. तर, एसयुव्ही कार विरुद्ध दिशेने येत होती.
अमित शहा यांनीही या घटनेची दखल घेत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. ‘गुजरातच्या नवसारी येथील रस्ते अपघात भीषण आहे. या घटनेत ज्य लोकांनी आपल्या कुटुंबीयांना गमावलं आहे त्यांच्याप्रति आमच्या संवेदना आहे. इश्वर त्यांना त्यांचं दुःख सहन करण्याची शक्ती देवो. जखमी रुग्णांवर स्थानिक प्रशासनाने त्वरीत उपचार करावेत. जखमी रुग्ण लवकरच बरे होण्याची प्रार्थना करतो,’ असं ट्वीट अमित शाहा यांनी केलं आहे.
ગુજરાતના નવસારીમાં થયેલ સડક દુર્ઘટના હૃદયદ્રાવક છે. આ દુર્ઘટનામાં જેમણે પોતાના પરિજનો ગુમાવ્યા છે તેમના પ્રત્યે સંવેદના વ્યક્ત કરું છું. ભગવાન તેમને દુ:ખ સહન કરવાની શક્તિ આપે. સ્થાનિક વહીવટીતંત્ર ઘાયલોને તાત્કાલિક સારવાર આપી રહ્યું છે, તેઓની ઝડપથી સ્વસ્થ થવાની પ્રાર્થના કરુ છું.
— Amit Shah (@AmitShah) December 31, 2022