घरट्रेंडिंगक्या बात! सीमेवरच्या जवानांसाठी गरमागरम पिझ्झा

क्या बात! सीमेवरच्या जवानांसाठी गरमागरम पिझ्झा

Subscribe

'भारतीय जवानांना ताजा आणि गरमागरम पिझ्झा खायला मिळावा आणि त्यांचे काही क्षण आनंदात जावे', या उद्देशातून डॉमिनोज कंपनीने त्याच्यांपर्यंत पिझ्झा पोहचवण्याचा अनोखा बेत आखला. 

देशाला आणि देशवासीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय जवान दिवस-रात्र सतत सीमेवर तैनात असतात. आपल्याला आपल्या घरी सुरक्षित राहता यावं यासाठी ते तिथे अतिशय प्रतिकूल परिस्थित, तहान-भूक विसरुन आपल्या जीवाची बाजी लावतात. दरम्यान, सीमेवर तैनात असताना समोर येईल ते खाऊन दिवस काढणाऱ्या या जवानांसमोर ताजा आणि गरमागरम पिझ्झा आला तर? ही कल्पनाच खूप सुखावह आहे. मात्र, त्याला सत्त्यात उतरवलं आहे ते ‘Domino’s ‘ या पिझ्झा बनवणाऱ्या कंपनीने. ‘भारतीय जवानांना ताजा आणि गरमागरम पिझ्झा खायला मिळावा आणि त्यांचे काही क्षण आनंदात जावे’, या उद्देशातून डॉमिनोज कंपनीने त्याच्यांपर्यंत पिझ्झा पोहचवण्याचा अनोखा बेत आखला. देशातील सर्वात उंच आणि थंड ठिकाणी अर्थात सियाचीन येथील बेसकॅम्पवर तैनात असलेल्या जवानांसाठी, डॉमिनोजचे कर्मचारी गरमागरम पिझ्झा घेऊन पोहोचले.

- Advertisement -

आता पिझ्झा म्हटलं की सहसा कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. याचप्रकारे समोर पिझ्झा पाहिल्यावर भारतीय जवानांनाच्या चेहऱ्यावरही आनंद आणि समाधान पाहायला मिळालं. कंपनीने इतक्या बर्फाळ आणि डोंगराळ भागात पिझ्झा पाठवण्यासाठी एक खास टीम तयार केली होती. मायनस डिग्री तापमान असलेल्या २० हजार फूटांवरील त्या बेस कॅम्पमध्येही गरमागरम पिझ्झा घेऊन गेल्यामुळे डॉमिनोजच्या त्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. ‘सियाचीनसारख्या ठिकाणी  आपल्या देशाच्या रक्षणासाठी खडतर कष्ट घेणारे जवान आणि त्यांचे अधिकारी यांना आम्ही गरम पिझ्झा पोहचवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे’, असे डॉमिनोजने त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यामध्ये कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे आणि येथील सैनिकांचे फोटोही अपलोड केले आहेत. जगभरातील लोकांकडून या उपक्रमाचं भरभरुन कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -