घरCORONA UPDATEगरम पाण्याची अंघोळ, गरम पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही? केंद्राचे स्पष्टीकरण

गरम पाण्याची अंघोळ, गरम पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही? केंद्राचे स्पष्टीकरण

Subscribe

गरम प्यायल्याने कोरोना होत नाही हे खोटे

कोरोना होऊ नये यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या ज्या प्रकारे वाढत आहे तस लोकांची मनातील भितीही वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही लोकांनी अनेक प्रयोग केलेले आपण पाहिले आहेत. कोरोना होऊ नये म्हणून सतत गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. सोशल मीडियावरही गरम पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही अशा अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. गरम पाणी प्यायल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोना नाहिसा होतो असा समज अनेकांच्या मनात आजही आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारने स्पष्टिकरण दिले आहे. ‘गरम पाणी प्यायल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनाचा विषाणू पुर्णपणे नष्ट होत नाही किंवा रोग पूर्णपणे बराही होत नाही. लॅब सेटिंग्जमध्ये कोरोना व्हायरस मरण्यासाठी ६० ते ७५ डिग्री सेल्सियस तापमान लागते’, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.

केंद्र सरकारने mygovindia या ट्विटर हँल्डलवरुन हे स्पष्टिकरण दिले आहे. गरम पाणी प्यायल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोना होत नाही या अफवांवर विश्वास ठेवू नका. गरम प्यायल्याने कोरोना होत नाही हे खोटे आहे. याव्यतिरिक्त सरकारने कोरोनातून बरे होण्यासाठी उत्तम जेवणाच्या पाच स्टेप्स सांगितल्या आहेत. त्या जर आमलात आणल्या तर कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होईल व येणाऱ्या काळात कोरोनाचा धोका टळेल.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी नाकातून लिंबाच्या रसाचे दोन थेंब टाकल्यानंतर कोरोना शरीरातून पूर्णपणे निघून जातो असा दावा करण्यात आला होता. तो दावाही खोटा ठरला होता.बोलो इंडियाने, MyGovIndia सह मेक इन इंडिया लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरु केले आहेत. यामार्फत ते एकत्रितपणे देशातील टियर २,३ आणि ४ शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करतात.


हेही वाचा – कॅन्सर रुग्णांनी कोरोना लस घेण्याआधी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -