घरदेश-विदेशजम्मू काश्मीर येथे भाजपा नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद

जम्मू काश्मीर येथे भाजपा नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एक पोलीस कॉन्स्टेबल शहीद

Subscribe

श्रीनगरच्या नौगाममधील भाजप नेते अन्वर खान यांच्या घरी गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले. तर या दहशतवादी हल्ल्यात पोलिस दलातील कॉन्स्टेबल रमीज राजा जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ते शहीद झाल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.

- Advertisement -

अन्वर खान हे बारामुल्लाचे जिल्हा सरचिटणीस असून कुपवाडाचे प्रभारी देखील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पोलिसांच्या रायफल घेऊन दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

यापूर्वी सोमवारी देखील दुपारी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी पालिका कार्यालयावर गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका नगरसेवकांचाही मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान, सोपोरमधील नगरपालिका कार्यालयाबाहेर दहशतवाद्यांनी बीडीसी सदस्य रियाझ अहमद आणि त्याचा सुरक्षा रक्षक शफत अहमद यांना गोळ्या घालून ठार मारले होते. या दहशतवादी हल्ल्यात रियाझ आणि शफत जागीच ठार झाले तर आणखी एक जण जखमी झाला होता. यावेळी या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाल्याचे सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -