Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशUddhav Thackeray : परकीय मदतीने केवळ भाजपचीच मते कशी वाढतात? उद्धव ठाकरे यांचा सवाल -

Uddhav Thackeray : परकीय मदतीने केवळ भाजपचीच मते कशी वाढतात? उद्धव ठाकरे यांचा सवाल –

Subscribe

अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी मोदींवर थेट ‘लेन-देन’चा ठपका ठेवला आहे, हे भारताने का सहन करायचे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांना केला आहे. 'सामना'तील अग्रलेखातून त्यांनी हा सवाल केला आहे.

Uddhav Thackeray On Election Funding : मुंबई : अमेरिकन प्रे. ट्रम्प यांचे प्रिय मित्र पंतप्रधान मोदी यांना ‘व्होटिंग टर्नआऊट’ म्हणजे मतदान वाढावे यासाठी 21 मिलियन डॉलर्स दिले. आणि हे स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले. भारतीय निवडणुका जिंकण्यासाठी मोदी यांनी परकीय पैसा वापरला, असे स्वतः प्रे. ट्रम्प सांगत आहेत. हा निवडणुकीत झालेला भ्रष्टाचार आहे. अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी मोदींवर थेट ‘लेन-देन’चा ठपका ठेवला आहे, हे भारताने का सहन करायचे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांना केला आहे. ‘सामना’तील अग्रलेखातून त्यांनी हा सवाल केला आहे. (how can only bjp’s votes increase with foreign help uddhav thackeray asks question)

प्रेसिडंट ट्रम्प यांनी सरळ सांगितले की, 21 मिलियन डॉलर्स प्रिय मित्र मोदींना दिले. यावर मोदी आणि त्यांचे अंधभक्त काहीच बोलायला तयार नाहीत. डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ‘‘पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात निवेदन जारी करावे. ट्रम्प यांना मानहानीची नोटीस पाठवावी.’’ डॉ. स्वामी यांचे म्हणणे खरेच आहे.

अमेरिकेचे प्रेसिडंट ट्रम्प यांनी मोदींवर ‘लेन-देन’चा ठपका ठेवला आहे, हे भारताने सहन करायचे काय? भारतात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अमेरिकेची आर्थिक मदत का लागावी आणि या मदतीने फक्त भाजपचीच मते कशी वाढतात? याचा खुलासा भारताचा निवडणूक आयोग, गृहमंत्री वगैरेंनी केलाच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी थेट ट्रम्प यांनाच म्हटले थँक यू, पण का? वाचा –

“प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारताला पैसे दिल्याचे अनेकदा सांगितले आहे. भारताला त्यांच्या निवडणुकांसाठी 21 मिलियन डॉलर्स दिले जात आहेत ते का म्हणून?, असा प्रश्न स्वतः ट्रम्पच करत असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. आपण निवडणुकांसाठी भारताला पैसे देत आहोत. त्यांना पैशांची गरज नाही. हे सांगतानाच प्रेसिडंट ट्रम्प यांनी भारताला ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढू शकेल असे ट्रम्प, मस्क वगैरे मंडळींचे म्हणणे आहे.

भाजप या कामासाठी पैसे घेतो व मतदारांना विकत घेण्यासाठी पैसे वापरतो हे आता चव्हाट्यावर आले. दुसऱ्या एखाद्या देशात हे असे प्रकरण चव्हाट्यावर आले असते तर त्या देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला असता. परकीय पैशांचा वापर करून निवडून आलेले सरकारही लोकांनी घरी बसवले असते, पण भारतातील लोकशाही बागेश्वर बाबांच्या मठात जाऊन चिंतन करीत आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : ते 16 फिक्सर्स कोण? त्यांची नावे जाहीर करा, संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘बाबा’ लोकांना भाजप प्रचाराचे कार्य दिले व त्यासाठी अमेरिकेचा पैसा वापरला. मतदानाचा हक्क बजावावा असे सांगणारी जाहिरातबाजी झाली. म्हणजे यासाठी अमेरिकेचा पैसा कामी आला. भारताची लोकशाही वाचविण्यासाठी मोदी हे प्रे. ट्रम्प यांचा पैसा वापरत असल्याचा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.