घरताज्या घडामोडीDelta Variant: चीनने ५ आठवड्यात डेल्टा व्हेरियंटवर मिळवले नियंत्रण

Delta Variant: चीनने ५ आठवड्यात डेल्टा व्हेरियंटवर मिळवले नियंत्रण

Subscribe

चीनमधून कोरोना नाहीसा झाल्याचे बोलले जात होते, पण गेल्या काही दिवसांपासून डेल्टा व्हेरियंटने चीनमध्ये कहर केला होता. चीनमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या केसेस झपाट्याने वाढत होत्या. परंतु आता चीनमध्ये कोरोना केसेस कमी होण्यास सुरुवात झाली आहे. चीन असा पहिला देश आहे, ज्याने ५ आठवड्यात डेल्टासारख्या धोकादायक व्हेरियंटवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच डेल्टा व्हेरियंटमुळे चीनमध्ये एकही मृत्यू झाला नाही आहे.

२० जुलैला पूर्व चीनच्या नानजिंग एअरपोर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यात डेल्टा व्हेरियंटचे संक्रमण झाल्याचे आढळले. त्यानंतर काही दिवसांनी चीनच्या १७ प्रातांमध्ये ५० हून अधिक शहरात कोरोनाच्या केसेस वाढू लागल्या. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, कडक लॉकडाऊन, येण्या-जाण्यावर बंदी, मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी आणि मेडिकल अॅक्शनसारखी तात्काळ कारवाई यामुळे चीनमध्ये डेल्टा व्हेरियंटवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. एवढेच नाहीतर काही भागांमध्ये ट्रेन आणि हवाई प्रवासावर बंदी घालण्यात आली होती.

- Advertisement -

द इकोनॉमिस्टच्या वृत्तानुसार, ११ ऑगस्टला चीनच्या पूर्व किनारपट्टीवरील निंगबो बंदर बंद करण्यात आले होते. कारण येथे काम करणारा एका ३४ वर्षीय व्यक्तीला डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या ६५० लोकांना ट्रेस केले गेले आणि सर्वांना क्वारंटाईन केले.

तसेच सीएनएनच्या रिपोर्टनुसार देशभरात कोरोना व्यवस्थापनेत बेजबाबदारपणा केल्यामुळे चीनने ४७ अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली. काहींना चीनी सरकारने पदावरून हटवले. चीनच्या कडक पावलामुळे २३ ऑगस्टला पहिल्यांदाच एकही केस आढळली नाही. कोरोना विरोधात चीनची लस असरदार असल्याचा दावा चीनने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – WHO: भारतात कोरोना व्हायरसचा मुक्काम दीर्घकाळच, लोकांना व्हायरससह जगावे लागणार 


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -