घरदेश-विदेशराम मंदिराचे काम किती पूर्ण झाले आहे? बांधकाम ट्रस्टच्या प्रमुखांनी दिली माहिती

राम मंदिराचे काम किती पूर्ण झाले आहे? बांधकाम ट्रस्टच्या प्रमुखांनी दिली माहिती

Subscribe

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. हे काम नेमके कधी पूर्ण होणार? याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या संदर्भातील माहिती राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र बांधकाम ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. हे काम नेमके कधी पूर्ण होणार? याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या संदर्भातील माहिती राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र बांधकाम ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांच्याकडून देण्यात आलेली आहे. (How complete is the work of Ram Mandir? information given by head of construction trust) या मंदिर उभारणीच्या पहिल्या टप्प्यातील काम हे 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होताच भक्तांना मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी प्रवेश मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राम मंदिराच्या बांधकामाबाबत माहिती देताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, मंदिराची निर्मिती तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर भक्तांना राम लल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येणार आहे. 30 डिसेंबर 2023 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असून पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहे. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार आहे. ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.

- Advertisement -

या मंदिर उभारणीत जे पाच मांडव उभारण्यात येणार आहेत, त्यासाठी जवळपास 160 खांब असणार आहे. तसेच आयकॉनोग्राफीचे काम देखील लवकर पूर्ण कण्यात येणार आहे. मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी यांसारख्या इतर सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही सर्व कामे 30 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे मंदिर समितीचे नियोजन आहे, असेही यावेळी नृपेंद्र मिश्रा यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

तसेच, मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याविषयी देखील नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला 30 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. भगवान रामाची मूर्तीची स्थापना या वर्षाखेरपर्यंत करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यापासून राम लल्लाचे दर्शन राम भक्तांना घेता येणार आहे. तर, डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिश्रा यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -