घरताज्या घडामोडीपरदेशात न जाताही दिल्लीतील रुग्णाला मंकीपॉक्सची लागण कशी? कसा होतो संसर्ग?

परदेशात न जाताही दिल्लीतील रुग्णाला मंकीपॉक्सची लागण कशी? कसा होतो संसर्ग?

Subscribe

मंकीपॉक्सची लागण झाल्याचं कळताच त्या रुग्णाला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तो परदेशी जाऊन आलेला नसतानाही मंकीपॉक्सची लागण कशी झाली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मंकीपॉक्सचा धोका दिवसेंदिवस वाढत जात आहे. जगभरातील ७५ देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले असून १६ हजारांहून रुग्णांना याची लागण झाली आहे. दरम्यान, भारतातही मंकीपॉक्सचे चार रुग्ण सापडले असून चौथा रुग्ण रविवारी दिल्लीत सापडला. मंकीपॉक्सची लागण झाल्याचं कळताच या ३४ वर्षीय रुग्णाला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तो परदेशी जाऊन आलेला नसतानाही मंकीपॉक्सची लागण कशी झाली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (How delhi man get infected with monkeypox without foreign travel history)

परदेशात न जाताही मंकीपॉक्सची लागण कशी?

- Advertisement -

दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण सापडल्याने डॉक्टरांनी आता अधिक खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, या आजाराला घाबरण्याची गरज नसून फक्त याबाबत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काहीच दिवसांपूर्वी संबंधित रुग्ण हिमाचल प्रदेश येथील एका पार्टीत गेला होता. त्या पार्टीतूनच त्याला मंकीपॉक्सची लागण झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

मंकीपॉक्सची लक्षणं काय?

- Advertisement -

मंकीपॉक्स एक सामान्य संसर्ग आहे. याची लक्षणं कांजण्यासारखी असतात. मानवी श्वसनक्रियेतून येणाऱ्या द्रव्यांपासून किंवा रुग्णांच्या शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कातून मंकीपॉक्सचा संसर्ग होतो. मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाला विलगीकरणात ठेवल्याने संसर्ग रोखता येईल.

पीडित रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवले?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या मेडिकल अहवालानुसार दिल्लीतील रुग्णाला एलएनजेपी रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, हा संसर्ग जिथून पसरला तिथे तो कोणा-कोणाशी संपर्कात आला याची माहिती घेण्यात आली आहे. तसेच, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेट करण्यात आलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -