घरCORONA UPDATEऑक्सिजन कॉसंट्रेटर्स कसे काम करते? केव्हा आणि कोण याचा कसा वापर करू...

ऑक्सिजन कॉसंट्रेटर्स कसे काम करते? केव्हा आणि कोण याचा कसा वापर करू शकतात?

Subscribe

हवेतून ऑक्सिजन तयार करणारी मशीन

देशात कोरोना महामारीचा (Covid 19) धोका आता दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा (Lack Of Oxygen) निर्माण झाल्याने रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. देशातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक वापरासाठी परदेशातून ऑक्सिजन कॉसंट्रेटर्स (oxygen concentrators) मागवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सिजन सिलेंडर(Oxygen cilender), ऑक्सिजन फ्लो मीटर ( Oxygen Flow Meter) आपल्याला माहिती होते मात्र आता कॉसंट्रेटर्स म्हणजे काय?(What are concentrators?) केंद्र सरकारने परदेशातून का मागवले आहे? या ऑक्सिजन कॉसंट्रेटर्सचा कसे काम करतो? ऑक्सिजन कॉसंट्रेटर आपणही वापरु शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

ऑक्सिजन कॉसंट्रेटर म्हणजे काय? ते कसे काम करते?

ऑक्सिजन कॉसंट्रेटर्स ही हवेतून ऑक्सिजन तयार करणारी मशीन आहे. ही मशीन सभोवतालची हवा शोषून घेते आणि त्या हवेला फिल्टर करुन ऑक्सिजनची पातळी वाढवली जाते आणि नायट्रोजन बाहेर फेकला जातो. वातावरणातील हवेत, साधारणपणे 78% नायट्रोजन आणि 21% ऑक्सिजन असतो. शरीराला आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा ज्याप्रकारे टँक किंवा सिलेंडर्स द्वारे केला जातो, त्याचप्रकारे तो ऑक्सिजन कॉसंट्रेटर्समधूनही केला जाऊ शकतो. त्यासाठी कॅन्युला म्हणजेच नलिका, ऑक्सिजन मास्क आणि नासिकेतील नलिकांची मदत घेतली जाते.

- Advertisement -

ऑक्सिजन कॉसंट्रेटर्स कोण करु शकतो?

ऑक्सिजन कॉसंट्रेटर्सचा वापर ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे ते याचा वापर करु शकतात. केवळ कोरोनाच्या रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉसंट्रेटर्सचा वापर केला जाऊ शकतो असे नाही. केव्हाही कोणत्याही अन्य आजाराच्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास त्याला ही ऑक्सिजन कॉसंट्रेटर्सचा वापर केला जाऊ शकतो.

बंगळूरूच्या सेंट जॉन मेडिकल कॉलेज, चे कोविड समन्वयक डॉ चैतन्य एच बालकृष्णन यांनी सांगितल्यानुसार, वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय, ऑक्सिजन काँसंट्रेटर्सचा वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. ज्यांना कोरोनामुळे सौम्य प्रमाणात न्युमोनिया झाला आहे आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी आहे. त्यांना पूरक उपचार म्हणून, ऑक्सिजन कॉसंट्रेटर्सच्या माध्यमातून, ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र, रूग्णांनी वैद्यकीय मार्गदर्शनाशिवाय स्वतःचा त्याचा वापर करणे अत्यंत हानिकारक ठरु शकते. त्याचप्रमाणे रुग्णाला रुग्णालयात बेड मिळत नाही तोवर ऑक्सिजन कॉनंस्ट्रेटर्सचा उपयोग करु शकता.

- Advertisement -

ऑक्सिजन कॉनंस्ट्रेटर्स किंमत काय असेल?

कोरोनाच्या परिस्थिती ऑक्सिजनची गरज असल्यामुळे वैयक्तिक वापरासाठी परदेशातून ऑक्सिजन कॉनंस्ट्रेटर्स मागवण्याची परवानगी देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय कॉनंस्ट्रेटर्स मागवू शकत नाही. याची किंमत साधारण: ३० हजार रुपयांपासून पुढे असेल. पीएम केअर निधीतून १ लाख कॉनंस्ट्रेटर्सची खरेदी केली जाणार आहे.


हेही वाचा – केंद्राचा मोठा निर्णय! वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स परदेशातून मागवता येणार

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -