नवी दिल्ली : एखाद्या कंपनीतले कामगार हे आपले घरगडीच आहेत. 24 तास त्यांना राबवून घ्यावे, असा तोरा काही कंपनीच्या मालकांचा असतो. असेच काहीसे वक्तव्य सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित असलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रोचे ( एलअॅण्डटी ) मुख्य कार्यकारी संचालक एस.एन सुब्रमण्यन यांनी केले आहे.
तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता? रविवारीच्या दिवशीही ऑफिसमध्ये येऊन काम करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम केले पाहिजे, असे अकलेचे तारे एस.एन सुब्रमण्यन यांनी तोडले आहेत. सुब्रमण्यन यांनी मुक्ताफळे उधळल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
हेही वाचा : 14 कोटी गुंतवणाऱ्या भाजी विक्रेत्यामुळे झाला टोरेसचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
सुब्रमण्यन काय म्हणालेले?
“तुम्ही घरी बसू काय करता? तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता? बायका आपल्या नवऱ्याची तोंडे किती वेळ पाहू शकतात? ऑफिसला या आणि काम सुरू करा. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम करायला हवे; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसमध्ये येऊन काम करायला हवे,” असं सुब्रमण्यन यांनी म्हटलं होते.
कंपनीने कर्मचाऱ्यांना शनिवारच्या दिवशीही काम करण्यास का सांगितलं आहे, असा प्रश्न विचारल्यावर सुब्रमण्यन म्हणाले, “मी तुम्हाला रविवारीही काम करण्यास बोलावू शकत नाही. तुम्हाला रविवारी काम करण्यास भाग पाडता आले असते, तर मला खूप आनंद झाला असता. कारण मी स्वत:हून रविवारी काम करतो.”
सुब्रमण्यन यांनी दिले चीनचे उदाहरण…
“चीन लवकरच अमेरिकेला मागे टाकून पुढे जाईल, असं म्हटलं जाते. कारण, चीनमधील लोक आठवड्याला 90 तास काम करतात. अमेरिकी लोक मात्र केवळ 50 तास काम करतात. चीनची कार्यसंस्कृती आपण स्वीकारायला हवी,” असेही सुब्रमण्यन यांनी सांगितलं.
हेही वाचा : टोरेस घोटाळ्याप्रकरणी पोलिसांचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त