महात्मा गांधींचे अपूर्ण स्वप्न कसे पूर्ण केले; पंतप्रधान मोदींनी सांगितली संबंधित घटना

Post-independence governments dismantled the Panchayat Raj system; PM Modi criticizes Congress PPK

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज वाराणसीच्या रुद्राक्ष केंद्रातून आंतरराष्ट्रीय टीबी परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महात्मा गांधींशी संबंधित एक घटना सांगितली आहे. गांधींचे स्वप्न त्यांनी कसे पूर्ण केले याबाबत ही घटना आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना कुष्ठ रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मी उद्घाटनाला येणार नाही, असे म्हटले. याशिवाय त्यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही मला कुष्ठ रुग्णालयाला कुलूप लावण्यासाठी बोलवाल तेव्हा मला आनंद होईल.

मोदी म्हणाले की, 2001 साली गुजरातच्या जनतेने मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. तेव्हा मला वाटले की गांधीजींचे एक स्वप्न अपूर्ण राहिले ते लवकर पूर्ण करायला पाहिजे. आमच्या सरकारने त्यावर काम केले आणि कुष्ठ रुग्णालयाला टाळे ठोकले. त्याच पद्धतीने देशाला क्षयरोगमुक्त करण्यासाठी आमच्या सरकारन पुढाकार घेतला आहे. यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच टीबी रुग्णांमध्ये जागृतीचा अभाव असल्यामुळे लोकांना जागरूक केले पाहिजे.

मोदींनी सांगितले की, काशीमध्ये गेल्या काही वर्षांपासून आरोग्य सेवांमध्ये खूप विकास झाला आहे. त्यमुळे लोकांना उपचारासाठी दिल्ली-मुंबईला जावे लागत नाही. ग्रामीण भागातही आरोग्य सेवा बळकट करण्यात आल्या आहेत. जनऔषधी केंद्रातून लोकांना स्वस्त:त औषधे मिळत आहेत. याशिवाय टीबीच्या विरोधात भारत प्रत्येक देशाच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे.

तीन दिवस चालणार जागतिक टीबी शिखर परिषद
पंतप्रधानांनी ‘वन वर्ल्ड टीबी समिट 2023’ चे आज उद्घाटन केले. पहिल्यांदाच दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत 2025 पर्यंत देश हागणदारीमुक्त करण्याच्या संकल्पावर सखोल चर्चा होत आहे. याशिवाय जागतिक क्षयरोग दिनानिमित्त ‘स्टॉप टीबी पार्टनरशिप’ या आंतरराष्ट्रीय संस्था आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राझील, नायजेरियासह विविध देशांतील प्रतिनिधी, तज्ज्ञ, सहयोगी संस्था आणि धोरण नियंत्रक यात सहभागी होत आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या शिखर परिषदेत क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासंदर्भात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या परिषदेतील सहभागी आरोग्य कल्याण केंद्रे आणि गावांनाही भेट देतील.