Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग C Voter Survey: कोरोनावरील मोदी सरकारच्या कामावर जनता किती समाधानी? बघा काय...

C Voter Survey: कोरोनावरील मोदी सरकारच्या कामावर जनता किती समाधानी? बघा काय सागंतय सर्वेक्षण

Related Story

- Advertisement -

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशावर मोठं संकट ओढाललं. या दरम्यान, हाजारो लोकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलं, कोरोनादरम्यान दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येने रुग्णालयातील बेड अपुरे पडू लागले होते. तर ऑक्सिजनचा देखील तुटवडा भासत असल्याचे समोर आले होते. या संपूर्ण चिंताजनक काळात लोकांनी मोदी सरकार आणि प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थितीत केलेत.

दरम्यान, एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणातील एजन्सी सी व्होटरला लोकांची मतं जाणून घेतली आहे. कोरोना महामारीदरम्यान, सरकारच्या कामकाजावर ते किती समाधानी आहेत, असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना, ७४ टक्के लोकांनी उत्तर होय असे उत्तर दिले, म्हणजेच ते समाधानी आहेत. तर २१ टक्के लोक असमाधानी होते. तर ५ टक्के असेही लोकं होते ज्यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. सर्वेक्षणात सी व्होटरने देशभरातील ४० हजार लोकांचे मत जाणून घेतले आहे. गेल्या तीन महिन्यांत कोरोना वाढल्यानंतर सरकारविरोधात जनतेत तीव्र नाराजी वाढली आणि जेव्हा सरकारने या महामारीवर योग्य पावलं उचलली तेव्हा नाराजी कमी झाली. १५ एप्रिलच्या सुमारास, सरकारवर समाधानी असलेल्या लोकांची संख्या ५७.७ टक्के होती, हीच वेळ होती जेव्हा दुसरी लाट सुरू झाली होती.

- Advertisement -

वाढत्या कोरोना दरम्यान, पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपावर मोर्चा काढल्याचा आरोप होता, त्यामुळे २२ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी सभा न घेण्याची घोषणा केली होती. तरीही ५१.२ टक्के लोक सरकारच्या कामांवर समाधानी होते. यानंतर कोरोनादरम्यान देशात एकच खळबळ उडाली होती. २ मे रोजी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी झाली तेव्हा पुन्हा नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. तोपर्यंत समाधानी असणार्‍यांची संख्या केवळ ३७.३ टक्के इतकीच होती. सी-व्होटरने लोकांना असेही प्रश्न विचारले की, कोरोना कालावधीत लोकांना बेड, आयसीयू, ऑक्सिजन मिळाला का? तर ३२ टक्के लोक म्हणाले की, हो सहज उपलब्ध झाले. १४ टक्के लोकं म्हणाले, की थोडीशा अडचणी निर्माण झाल्यात. ६ टक्के म्हणाले की, त्यांना खूप त्रास झाला असून ९ टक्के म्हणाले की, हे सर्व मिळण्यास अडचणी निर्माण झाल्यात. तर ३९ टक्के लोकांनी गरज नसल्याचे सांगितले.

 

- Advertisement -