घरताज्या घडामोडीकोरोनामुक्तीनंतर किती दिवसांनी इतरांच्या संपर्कात येऊ शकता? AIIMSच्या प्रमुखांनी सांगितला कालावधी

कोरोनामुक्तीनंतर किती दिवसांनी इतरांच्या संपर्कात येऊ शकता? AIIMSच्या प्रमुखांनी सांगितला कालावधी

Subscribe

दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितला कालावधी.

दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज लाखोच्या संख्येने नव्या बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा ताण आला आहे. बऱ्याच रुग्णांना बेड मिळत नसल्याने घरीच उपचार करावे लागत आहेत. मात्र, घरी होम क्वारंटाईन झाल्यानंतर ती व्यक्ती कोरोनामुक्त झालेली असो किंवा रुग्णालयातून कोरोनावर मात करुन आलेली असो. बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडतो की, त्या व्यक्तीच्या संपर्कात किती दिवसांनी याचे? तो कालावधी नेमका किती दिवसांचा असावा. याबाबत दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कालावधी बाबत सांगितले आहे.

काय आहे कालावधी?

एम्स रुग्णालयाच्या प्रमुखानी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुरुवातीच्या काळात कोरोनामुक्त झाल्यानंतर ४८ तासांनी म्हणजे दोन दिवसांनी तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकत होतात. त्यानंतर त्या कालवधीत वाढ करण्यात आली आणि तो कालावधी दोन आठवड्यांचा करण्यात आला. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या दोन आठवड्यानंतर संपर्कात येऊ शकत होतात. मात्र, आताच्या अभ्यासानुसार तुम्ही पॉझिटिव्ह होऊन १० दिवस होऊन गेले आणि त्यानंतर तुम्हाला तीन दिवस ताप नाही आला, तर तुम्ही इतरांच्या संपर्कात येऊ शकता’.

- Advertisement -

RTPCR चाचणी अहवाल येऊ शकतो पॉझिटिव्ह

एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी आरटीरपीसीआर चाचणी आवश्यक असते. परंतु, RTPCR चाचणी जर एखाद्या कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीची केली, तर त्या व्यक्तीचा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह येऊ शकतो, कारण RTPCR चाचणी डेथ व्हायरस देखील दाखवतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह येतो.


हेही वाचा – Covid-19: हाँगकाँगने भारतातून येणार्‍या फ्लाईट्सला ३ मे पर्यंत घातली बंदी

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -