घरदेश-विदेशदिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि कुटुंबीयांच्या नावे किती रस्ते? सुधांशू त्रिवेदींचा सवाल

दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि कुटुंबीयांच्या नावे किती रस्ते? सुधांशू त्रिवेदींचा सवाल

Subscribe

मुंबई : दिल्लीत औरंगजेबाच्या संपूर्ण परिवाराच्या नावांवर रस्त्यांची नावे आहेत. बाबर रोड, हुमायूँ रोड, अकबर रोड, शाहजहाँ रोड, औरंगजेब रोड… लुटीयन्स दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने किती रस्ते आहेत? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी टीकाकारांना केला आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने याच वादग्रस्त विधानावर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चर्चेत भाजपचे प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबला पत्र लिहून माफी मागितली होती, असे वक्तव्य केले होते. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर सुधांशू त्रिवेदी यांनी आज अहमदाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदू, हिंदू धर्म, हिंदुत्व आणि भारतीय इतिहासात हिंदुत्वाचे सर्वात मोठ्या महानायकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांच्याबद्दल माझ्या मनात किंचित देखील अनादर आहे, असे कोणाला जर वाटत असेल तर, त्याने आपल्या स्वत:च्याच बुद्धीचा विचार केला पाहिजे असे मी नम्रपणे सांगेन, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ भाजपा प्रदेशचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी एका ट्वीटद्वारे शेअर केली आहे.

- Advertisement -

जे मला प्रश्न विचारत आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला मानतात का? छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 एप्रिल 1645 रोजी शपथ घेतली होती की, ‘हिंदवी साम्राज्य’ स्थापन करेन. तर, हे टीकाटिप्पणी करणारे हिंदू साम्राज्य हा शब्द मानत नाहीत. त्यानंतर त्यांचे साम्राज्य बनले त्यांचे नाव होतं हिंदूपतपातशाही. ते त्यालाही मानत नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला. त्यांनी पुस्तकात एक आणि दगडांवर वेगळेच लिहिले. ज्यांना क्रूर खलनायक समजले गेले, त्यांच्या संपूर्ण परिवाराचे दगडांवर नाव लिहिले, असे सांगून सुधांशू त्रिवेदी म्हणाले, उलट, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म आणि हिंदूंसाठी जे केले, ते संपूर्ण विचार त्याच रुपात आमच्या मनात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -