घरताज्या घडामोडीPF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे करावी लागते नोकरी? काय आहेत नियम...

PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे करावी लागते नोकरी? काय आहेत नियम व अटी? जाणून घ्या

Subscribe

निवृत्ती वेतनाचा हक्क मिळवण्यासाठी सलग १५ वर्षे EPF खात्यात पैसे जमा करावे लागतात

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार लोकांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हे अनिवार्य केले आहे. PFमुळे आपली नियमिक गुंतवणूक त्याचप्रमाणे कर बचत आणि भविष्यातील सुरक्षितता मिळते. PF खात्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला भविष्यात पेन्शनचा अधिकार आहे. भविष्यात जर PF खात्यात पैसे गुंतवले तर PF खात्यात पेंशन मिळवण्यासाठी किती वर्षे नोकरी करावी लागते? त्यासाठी नियम काय आहेत? कोणत्या अटी आहेत? जाणून घ्या. भविष्य निधी निर्वाह नेहमी कर्मचाऱ्यांच्या पगारातील रक्कम दोन खात्यात जमा करते. एक म्हणजे EPFआणि दुसरी म्हणजे पेंन्शन फंड म्हणजेच EPS. वाजावटीच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारामधून एकूण १२ टक्के कपात केली जाते. ही रक्कम नियोक्त कंपनी किंवा संस्था कर्मचाऱ्यांच्या EPFखात्यात जमा करते.

काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमांनुसार, EPF खात्यातील एक रक्कमेचा भाग EPSखात्यात जातो. महिन्याला ६५०० रुपये किंवा १५००० रुपये वेतमानानानुसार ठरवले जातात. १ सप्टेंबर २०१४ च्या आधी या योजनेच जोडले गेला असाल तर दर महिना ६५०० रुपये पगाराच्या हिशोबाने जमा केले जातात. त्यानंतर या योजनेशी जोडले गेले असाल तर दर महिना १५००० रुपये जमा करावे लागतात.

- Advertisement -

पेन्शनसाठी नियम 

  • EPFO सदस्यांना निवृत्ती वेतनाचा हक्क मिळवण्यासाठी सलग १५ वर्षे EPF खात्यात पैसे जमा करावे लागतात.
  • ज्यावेळेस कर्मचाऱ्यांचे EPF खाते उघडले जाते त्याचवेळेस EPS खातेही उघडले जाते.
  • खात्यात बेसिक वेतनाच्या १२ टक्के रक्कम भरावी लागते.
  • १२ टक्क्यांमधील ८.३३ टक्के पैसे EPS खात्यात जमा होतात तर ३.६७टक्के पैसे EPFखात्यात जमा केले जातात.
  • दरमहिन्याला EPS खात्यात १ हजारांहून अधिक रक्कम जमा केली जाऊ शकते.

हेही वाचा – ‘या’ दिवशी १४ तासांसाठी NEFTमनी ट्रान्सफर सर्व्हिस राहणार बंद, जाणून घ्या कारण

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -