घरताज्या घडामोडीCorona Vaccine: भारतात Sputnik V ची किंमत काय असणार?

Corona Vaccine: भारतात Sputnik V ची किंमत काय असणार?

Subscribe

कोरोना लढण्यासाठी आता भारतात कोरोनाची तिसरी लस सज्ज झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI)ने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली. त्यामुळे आता लवकरच स्पुटनिक व्ही लस देशभरात उपलब्ध होणार आहे. पण आतापर्यंत या लसीची किंमत काय असेल? याचा निर्णय अजून घेतला नाही आहे. पण सध्या देशात स्पुटनिक व्ही लसीच्या किंमतीबाबत अनेक तर्क विर्तक लावले जात आहेत. परंतु असे बोलले जात आहे की, एस्‍ट्राजेनेकाची कोविशिल्ड लसीची किंमत प्रति डोस २ डॉलर अशी जुळणारी नसेल. भारत सरकार या किंमतीवर कोविशिल्डची खरेदी करीत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लस विकसित केली आहे.

रशियन थेट गुंतवणूक निधी (RDIF)चे सीईओ किरील दिमित्रीव यांनी एक हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले की, ‘इतर बाजारामध्ये स्पुटनिक व्ही एस्‍ट्राजेनेकापेक्षा महाग आहे. आमच्या उत्पादन प्रक्रियेस दिलेली किंमत आपल्याला मिळेल अशी मी अपेक्षा करत नाही.’

- Advertisement -

सध्या इतर बाजारात स्पुटनिक व्ही लसीची किंमत जवळपास १० डॉलर प्रति डोस आहे. किरील दिमित्रीव म्हणाले की, ‘सर्व देशांसाठी लसीची किंमत समान आहे. भारतासह ६० देशांमध्ये रशियाच्या लसीला मंजूरी मिळाली आहे. काही देशांमध्ये लस पाठवण्यात आली आहे. आम्हाला माहित आहे की, भारत सरकारकडून किंमत वाजवी ठेवण्याबाबत काही बाबी आहेत. सरकार करारानुसार आणि खासगी बाजारानुसार वेगवेगळी किंमत आहे. लसीवर मोठा नफा मिळवणे हे उद्दीष्ट नाही आहे, परंतु त्याची किंमत परत मिळायला पाहिजे. जगाला लस मिळावी, हे आमचे उद्दीष्ट आहे.’

भारतात कोरोनाशी लढण्यासाठी तीन लस उपलब्ध झाल्या आहेत. देशांमध्ये स्पुटनिक व्ही लस पाच फार्मा कंपनी तयार करणार असून एक वर्षात सुमारे ८५० मिलियन डोस बनवले जातील. एप्रिल महिन्याच्या अखेरीस ही लस उपलब्ध होऊ शकते.

- Advertisement -

दिमित्रीव म्हणाले की, ‘पहिल्या टप्प्यात लसीचे डोस एप्रिलच्या अखेरस आणि मेच्या सुरुवातील उपलब्ध होतील. भारतात पाच फार्मा कंपन्यांशी बातचित झाली असून या कंपन्या लस विकसित करतील. सध्या प्रोडक्शन वाढवण्यात एक-दोन महिन्यांचा कालावधी लागेल. भारतात जून महिन्यापर्यंत प्रोडक्शनची क्षमता चांगली असेल, असे आम्हाला वाटते. आम्ही भारतात लसीकरण मोहिमेमध्ये खूप महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध करू.’


हेही वाचा – Sputnik V : ‘स्पुटनिक व्ही’ लसीला अखेर DCGI ची मंजुरी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -