CoronaVirus: एसीमुळे रेस्टॉरंटमध्ये कोरोनाचा फैलाव!

ac
एसीमुळे कोरोनाचा धोका वाढतो?

कोरोना व्हायरसच्या फैलावाची सुरुवात चीनमधील वुहान शहरातून सुरू झाली. वुहान शहरातून परलेले एक कुटुंब क्वांगचौमधील रेस्टॉरंटमध्ये जेवणाकरिता गेले होते. या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाची लक्षणे होती पण त्याला ते स्वतःला माहिती नव्हते. काही दिवसांनंतर या रेस्टॉरंटमधील इतर नऊ जणांना कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली. कारण या रेस्टॉरंटमधील एसीमुळे कोरोना व्हायरस पसरला आणि इतर बाजूला बसलेल्या तीन कुटुंबातील लोकांना त्यांची लागण झाली. हे तिन्ही कुटुंब एकमेकांच्या थेट संपर्कात आले नव्हते. दरम्यान या रेस्टॉरंटमधील डिनरसाठी आलेले इतर ७३ जणांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली नाही आहे. त्यामुळे चीनने याचा शोध घेतला आणि एसीमधून कोरोना पसरल्याचे समोर आले.

न्यूयॉर्कच्या म्हणण्यानुसार, तज्ज्ञांनी चीनच्या सीडीसीच्या संशोधन पत्रात उल्लेख केला आहे. तज्ज्ञांचा असा निष्कर्ष आहे की, रेस्टांरटमधील एका व्यक्तीमुळे कोरोना व्हायरस संक्रमित असून तो एका कुटुंबातील होतो. संक्रमित रुग्णांच्या या कुटूंबाला ‘फॅमिली ए’ असे नाव चीनच्या तज्ज्ञांनी दिले आहे. तर इतर कुटुंबांना ‘फॅमिली बी’ आणि ‘फॅमिली सी’ नाव दिले आहे.

२४ जानेवारीला ‘फॅमिली ए’ने क्वांगचौमधील रेस्टॉरंटमध्ये डिनर केला. मग एका दिवसानंतर या कुटुंबातील ६३ वर्षीय वृद्ध महिलेला खोकला आणि ताप आला आणि तिला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. अहवालानुसार, दोन आठवड्यातच रेस्टॉरंटमधील नऊ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये काही जण या रेस्टॉरंटमध्ये त्याचवेळेस उपस्थित होते. त्यातील चार जण त्या वृद्ध महिलेचे नातेवाईक होते. तर इतर लोक ‘फॅमिल ए’ टेबलच्या आजूबाजूला बसले होते.

एकमेकांशी थेट संपर्क नसतानाही रेस्टॉरंटमधील ‘फॅमिली ए’ जवळच्या बसलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची चीनच्या तज्ज्ञांनी निष्कर्ष काढला. हे लोक सुमारे एक तास ‘फॅमिली ए’च्या बाजूला बसले होते. ‘फॅमिली सी’ टेबलच्यावरती एसी लावला होता. त्याच्या फ्लो इतर तीन टेबलपर्यंत जात होता. त्यामुळे रेस्टॉरंटमधील लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला.


हेही वाचा – CoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!