Aadhaar Card वरील फोटो, मोबाईल नंबर बदलायचा आहे? ‘या’ सोप्प्या स्टेप्स फॉलो करा

how to change photo and mobile number in aadhar card esay steps
Aadhaar Card वरील फोटो आणि मोबाईल नंबर कसा बदलाल? 'या' सोप्प्या स्टेप्स फॉलो करा

Aadhaar Card: अनेकदा आधार कार्डवरील मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर माहिती भरताना चूक होते. मात्र या चुकांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या चुका दुरुस्त करायच्या कशा असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र घर बसल्या तुम्ही आधार कार्डवरील चुका ऑनलाईन दुरुस्त करु शकता.

या आधार कार्डवर व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, बायोमेट्रिक डेटा, फोटोग्राफ अशी अनेक माहिती असते. आधारकार्ड वरील ही माहिती अधिकृत मानली जाते. त्यामुळे बँक, मोबाईल कनेक्शन आणि सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे असते. मात्र या आधारकार्डमधील माहितीत चूक झाल्यास ऑनलाईन ती चुक कशी दुरुस्त करायची याच्या काही सोप्प्या स्टेप्स जाणून घेऊ..

कसा कराल ऑनलाईन बदल?

आधार कार्डावरील मोबाईल नंबर किंवा इतर कोणताही चुक तुम्ही घर बसल्या दुरुस्त करु शकता. याशिवाय तुम्हा मोबाईल नंबरही अपडेट करु शकता. UIDAI ने आधारशी जोडलेला मोबाईल नंबर घर बसल्या बदलण्याची सुविधा दिली आहे. मात्र आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारकार्डवर रजिस्ट्रर असणे गरजेचे आहे. कारण त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला माहिती अपडेट करण्यासाठी ओटीपी पाठवला जाईल.

Aadhaar Card वरील मोबाईल नंबर कसा बदलणार?

1) सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत uidai.gov.in वेबसाईटवर जा.

२) आधारशी जोडायचा असलेला मोबाईल नंबर टाका. कॅप्चा भरा.

३) यानंतर Send OTP वर क्लिक करत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि Submit वर क्लिक करा.

४) खाली स्क्रोल करत Online Aadhaar Services वर जा. यात तुम्हाला आधारवरील नाव, पत्ता, लिंग, ईमेल, मोबाईल नंबर आणि इतर माहिती दिसेल.

५) आत्ता आधारवर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर सेलेक्ट करा.

६) यात What do you want to update ऑप्शन सेलेक्ट करा.

७) आता एक नवीन पेज ओपन होईल ज्यात कॅप्चा कोड भरा. मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर Save and Proceed पर क्लिक करा.

Aadhaar Card वरील फोटो बदलण्याच्या सोप्प्या स्टेप्स

१) सर्वप्रथम uidai.gov.in वेबसाईटवर जा. यानंतर Get Aadhaar सेक्‍शनमध्ये जाऊन आधार एनरोलमेंट/अपडेट फॉर्म डाउनलोड करा.

२) हा फॉर्म व्यवस्थित बिनचुक भरून आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जमा करा.

३) या आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये तुमचे फ‍िंगरप्रिंट्स, रेटीना स्‍कॅन आणि फोटोग्राफ पुन्हा कॅप्चर केले जाईल.

४) तुम्हाला आधार संबंधीत माहिती अपडेट करण्यासाठी ५० रुपये फी द्यावी लागेल.

५) फोटो अपडेट करण्याचे अॅप्लिकेशन स्वीकारल्यानंतर तुम्हाला एक URN अपडेट रिक्‍वेस्‍ट नंबर मिळेल.

६) या नंबरच्या माध्यमातून तुम्हाला अॅप्लिकेशन ऑनलाइन ट्रॅक करता येईल.

७) यानंतर अपडेट झालेले नवे आधार कार्ड तुम्हाला जवळपास ९० दिवसात मिळेल.