UPSC Exam: घरबसल्या करू शकता यूपीएससी परीक्षेची तयारी, जाणून घ्या काय आहे स्ट्रॅटेजी?

चालू घडामोंडीवर अभ्यास करणं महत्त्वाचं...

UPSC Recruitment: A golden opportunity to work as an officer in the Ministry of Information and Broadcasting.

नवी दिल्ली – यूपीएससी परिक्षेसाठी कमी दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. तसेच देशातील सर्वात कठीण परीक्षा असणाऱ्या सिव्हिल सेवा परीक्षेला थोडेच दिवस शिल्लक असून ही परीक्षा आगामी वर्षात आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा पुढच्या वर्षातील जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन टॉपिक्स वाचण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी प्लॅन करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही घरबसल्या यूपीएससी परीक्षेची तयारी सुद्धा करू शकता.

संघ लोकसेवा आयोगाने मेम्स परीक्षाचं नोटीफीकेशन जारी केलं आहे. यूपीएससी सिव्हिल सेवा मेन्स परीक्षा जानेवारी महिन्यातील २०२२ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही खूप कठीण परीक्षा आहे. परंतु वेळेचं मॅनेजमेंट, स्टडी प्लॅन संपूर्ण लक्ष ठेवून करू शकता. सरकारी नोकरीमध्ये यूपीएससीची नोकरी सर्वात बेस्ट समजली जाते. जर तुमचं आयएएस ऑफिसर बनण्याचं स्वप्न असेल. तर तुम्ही घसबसल्या सुद्धा यूपीएससी अभ्यासाची नियोजितपणे तयारी करू शकता.

यूपीएससीच्या टॉपिकची लिस्ट बनवा

सर्वात आधी यूपीएससीचा अभ्यासक्रम समझून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसार अभ्यास करण्यासाठी एक मार्ग मिळतो. आयएएसच्या परीक्षेच्या अभ्यास करण्यासाठी तुम्ही upsc.gov.in मधून डाऊनलोड करू शकता. सिव्हिल सेवा परीक्षा २०२१च्या अभ्यासक्रमात चेकलिस्ट बनवल्यामुळे तुम्हाला मोठी मदत होऊ शकते.

मागील वर्षातील प्रश्न सोडवा

प्रत्येक यूपीएससी उमेदवाराला मागील वर्षातील प्रश्न पत्रिका सोडवणे किंवा त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण मागील वर्षाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही प्लॅन करू शकता. पेपर पॅटर्न समझून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने कमी कमी दहा वर्षांपूर्वीचे पेपर सोडविणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करता येईल.

चालू घडामोंडीवर अभ्यास करणं महत्त्वाचं

यूपीएससी परीक्षेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चालू घडामोडींवर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे कोणताही प्रश्न हा परीक्षेत विचारला असता, तुम्हाला सोडवण्यासाठी मोठी मदत मिळू शकते. तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र वाचणे खूप महत्त्वाचं आहे.