Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग आता आधारला LPG कनेक्शनसह Online करता येणार लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आता आधारला LPG कनेक्शनसह Online करता येणार लिंक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Related Story

- Advertisement -

सरकारच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेंतर्गत प्रत्येक सिलिंडरवरील अनुदानाची रक्कम थेट ग्राहक बँकेच्या खात्यात जमा केली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आधारला LPG कनेक्शनसह जोडायचे असेल तर ते आता शक्य आहे. कारण LPG अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधारला LPG कनेक्शन लिंक असणे आवश्यक आहे. कोणीही वेबसाइट, LPG वितरकाच्या माध्यमातून कॉल करून, IVRS द्वारे किंवा SMS पाठवून आधारला LPG लिंक करणं शक्य आहे.

आधारला LPG कनेक्शनसह ऑनलाइन कसं करता येणार लिंक, जाणून घ्या

१. rasf.uidai.gov.in/seeding/User/ResidentSelfSeedingpds.aspx या संकेतस्थळावर जाऊन भेट द्या, आणि आवश्यक ती माहिती भरा.

- Advertisement -

२. LPG अंतर्गत ‘बेनिफिट प्रकार’ निवडा आणि त्यानंतर LPG कनेक्शननुसार योजनेचे नाव सिलेक्ट करा, जसे की भारत गॅस कनेक्शनसाठी ‘BPCL’ आणि इंडेन गॅस कनेक्शनसाठी ‘IOCL’.

3. ड्रॉप-डाउन लिस्टमधून तुमचा ‘वितरक’ निवडा आणि LPG ग्राहक क्रमांक तेथे नमूद करा.

- Advertisement -

४. मोबाइल नंबर, ईमेल आणि आधार क्रमांक नमूद करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर एक ओटीपी येईल. पुढे प्रक्रिया करण्यासाठी ओटीपी टाकून पुढील माहिती भरा. यानंतर नोंदणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून तपशिलाची पडताळणी केली जाईल आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर तसेच ईमेल आयडीवर सूचना पाठविली जाईल.

LPG सेवा देणाऱ्याला SMS पाठवून LPG कनेक्शनसह आधार लिंक केले जाऊ शकते. यासाठी तुमच्या LPG वितरकाकडे मोबाइल नंबर नोंदवा आणि नंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून SMS पाठवा. हा नंबर वितरकाच्या वेबसाइटवरून तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो.


- Advertisement -