Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश PAN - Aadhar शी लिंक करण्याच्या ९ सोप्या Steps

PAN – Aadhar शी लिंक करण्याच्या ९ सोप्या Steps

Related Story

- Advertisement -

जर तुम्ही अजूनही तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर लवकरच लिंक करुन घ्या. कारण ३१ मार्चपर्यंत आधार पॅन कार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला १ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच तुमचे PAN CARD अवैध्य म्हणून घोषित केले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही ऑनलाईन पॅनकार्ड आधारशी लिंक केले नसले तर  खालील ९ सोप्प्या गोष्टींचा वापर करा. आणि आपले PAN  – Aadhar शी आजचं लिंक करा.

पॅनकार्ड- आधार कार्डशी लिंक कसे करायचे

१. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी आधी तुमचे पॅन आणि आधार कार्ड समोर ठेवा.

२. इन्कम टॅक्स डिपोर्टमेंटच्या ई- फायलिंग पोर्टलवर ओपन करा. यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in चा वापर करा.
- Advertisement -

३. यानंतर क्विक लिंक्स (Quick Links) सेक्शनमध्ये डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार (Link Aadhaar) या ऑप्शनवर क्लिक करा.

४. त्यानंतर Aadhar link करण्यासाठी एक नवीन पेज ओपन होईल. (https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng)

- Advertisement -

५. या पेजवर तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक आणि आधार कार्डवरील आपले नाव अशी माहिती भरावी लागणार आहे.

६. जर तुमच्या आधार कार्डवर जन्म वर्षाचा (Birth Year) उल्लेख असेल तरचं ( I have only year of birth in Aadhar Card) या बॉक्सवर क्लिक करा.

७. सर्व माहिती चेक करत सहमतीसाठी विचारणाऱ्या ( I agree) बॉक्सवर क्लिक करा.

८. आपल्या स्क्रिनवर दिसणारा कॅप्चा कोड (Captcha Code) भरा. ( दृष्टीहीन व्यक्तींसाठी Captcha Code ऐवजी वन-टाईम पासवर्ड किंवा ओटीपीसाठी विनंती करु शकतात. त्यानंतर OTP आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळेल.)

९. शेवटचा पर्याय लिंक आधार (link Aadhar) या बटणावर क्लिक करा आणि रिक्वेस्ट सबमिट करा.

अशा सोप्प्या पद्धतीने तुम्ही तुमचे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करु शकतात.

मोबाईल फोनटद्वारे पॅन-आधारला लिंक करण्यासाठी

१. आपण 567678 किंवा 56161 वर UIDPAN<12digit Aadhaar><10-digit PAN> या फॉरमॅटनुसार एसएमएस पाठवू शकता.
(उदाहरणार्थ, आपला आधार क्रमांक 16743120 असेल आणि तुमचा पॅन AR21456AF असा असेल तर UIDAI स्पेस 16743120 AR21456AF टाइप करा आणि 567678 किंवा 56161 वर पाठवा.

२. यानंतर तुम्हाला पॅन -आधार कार्डशी लिंक झाल्यावर त्याची सुचना मिळेल.


 

- Advertisement -