खेळाडू नसतानाही क्रिडा क्षेत्रात कसं घडवाल करियर?

career in sports
प्रातिनिधिक छायाचित्र

क्रिडा क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तुम्ही उत्तम खेळाडू असणं गरजेचंच आहे असं नाही. तुम्हाला खेळात आवड असेल आणि त्याच क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कोणत्याही क्षेत्रात स्वतःचं उत्तम करिअर घडवू शकाल. (How to make career in sports filed even if you are not sportsperson)

स्पोर्ट्स फोटोग्राफर

कोणत्याही स्पर्धेत तुम्ही स्पोर्ट्स फोटोग्राफी करू शकता. स्पर्धेतील लाईव्ह फोटो पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. उत्तम फोटोग्राफरला फक्त प्रत्येक लाईव्ह मोमेंट क्लिक करता आले पाहिजेत. प्रत्येक महत्त्वाचा क्षण क्षणार्धात क्लिक करता पाहिजे. अशी खासियत तुमच्यात असेल तर तुम्ही स्पोर्ट्स क्षेत्रात चांगलं करिअर घडवू शकता. हे काम शक्यतो फ्रिलान्सर पद्धतीने केलं जातं. तुमचा एखादा लाईव्ह फोटो, उत्तम क्लिक तुम्हाला हजारो रुपये कमवून देऊ शकतो. असे फोटो मॅगजिन, वर्तमानपत्रांना विकले जातात. कधीकधी करारपद्धतीने हे काम केलं जातं.

हेही वाचा – पाय घसरून जमिनीवर कोसळला, पण हरला नाही.., नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी

स्पोर्ट्स पत्रकार

तुम्ही क्रिएटीव्ह लिहू शकता, वार्तांकन करू शकता आणि समालोचन करू शकत असाल तर तुम्ही स्पोर्ट्स क्षेत्रात तुमचं करिअर घडवू शकता. अनेक स्पोर्ट्स पत्रकार या क्षेत्रात नावाजलेले आहेत. यासाठी तुम्हाला संबंधित खेळाविषयी सर्व तांत्रिक आणि मुद्देसुद माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही नियमित बातम्या वाचण्यास सुरुवात केल्यास या क्षेत्रात आपला जम बसवू शकता. याकरता तुम्ही बॅचरल ऑफ मास मीडिया ही तीन वर्षांची डिग्री घेऊन कोणत्याही माध्यमात इंटर्नशीपपासून सुरुवात करू शकता. तसेच, या डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही स्पोर्ट्स पीआरसुद्धा करू सकता.

हेही वाचा – वनडे सामन्यात गल्ली क्रिकेटचे वातावरण, बॉल शोधण्यासाठी खेळाडू-कॅमेरामन थेट झाडात

स्पोर्ट्स मॅनेजमेंट

कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे उत्तम मॅनेजमेंट स्किल अंगी असणे फार महत्त्वाचं असतं. तुमच्यात उत्तम व्यवस्थापनाचं कौशल्य असेल आणि स्पोर्ट्सची आवड असेल तर तुम्ही स्पोर्ट्स मॅनेजमेंट क्षेत्रात तुमचं करिअर घडवू शकता. Master of Physical education, M.Sc in Sports Coaching, Post Graduate Diploma in Sports Medicine, Post Graduate Diploma in Sports Management, Post Graduate Diploma in Sports Business, MBA in Sports Management यापैकी कोणतीही पदवी घेऊन तुम्ही तुमच्या करिअरला सुरुवात करू शकता.

हेही वाचा – आयपीएलच्या नव्या पर्वाचा डिस्ने+हॉटस्टारला फटका बसण्याची शक्यता

फिटनेस एक्सपर्ट

फिटनेस ट्रेनर ही आजच्या काळातील सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे. खेळाडू घडवणं आणि त्यांचं कौशल्य वाढवणं हे फिटनेस एक्सपर्टच्या हातात असतं. अनेक खेळाडू त्यांच्या फिटनेससाठी फिटनेस एक्सपर्ट ठेवतात. त्यामुळे तुम्ही फिटनेस फ्रिक असाल आणि स्पोर्ट्सची आवड असेल तर तुम्ही उत्तम फिटनेस एक्सपर्ट बनू शकाल. Diploma in Personal Training (DPT), CPT for Special Populations (CPT-SP), Certified Sports Nutritionist (CSN)
National Academy of Sports Medicine (NASM) Certified Personal Trainer (CPT) program यापैकी कोणतीही एक पदवी घेऊन तुम्ही उत्तम फिटनेस एक्सपर्ट बनू शकतात.

स्पोर्ट कोच

कोणताही कोच कधीच मैदानात खेळायला उतरत नाही. पण मैदानात खेळणाऱ्या खेळाडूला कोचच घडवू शकतो. खेळ कसा खेळावा याचं मार्गदर्शन तर कोच देतोच शिवाय, खेळाडूचा सर्वांगिण विकासही कोच करत असतो. यासाठी तुम्ही स्पोर्ट्स कोचिंग, स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा स्पोर्ट्स सायन्सची पदवी घेऊ शकता.

कॉमेंटेटर

कॉमेंटेटर म्हणजेच समालोचक. फक्त क्रिकेटमध्ये कॉमेंटेटर असतात असे नाही. तर, प्रत्येक खेळाच्या स्पर्धेचं समालोचन केलं जातं. या क्षेत्रात सध्या सुगीचे दिवस आहेत.

स्पोर्ट्स लॉयर

प्रत्येक क्षेत्रात ज्याप्रमाणे वकिलाला नेमलं जातं, त्याचप्रमाणे क्रिडा क्षेत्रातही वकिलाला नेमलं जातं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या क्लायंटला वकिल प्रतिनिधित्व करतात. एखादा खेळाडू जर कोणत्याही गोष्टीसाठी करार करत असेल तर तो करार तयार करणे, तो करार समजून घेणं हे स्पोर्ट्स लॉयरचं काम असतं. एकंदरीत आपल्या खेळाडूला कायदेशीर पाठिंबा देण्याचं काम स्पोर्ट्स लॉयरचं असतं.