Pulse किंवा Oximeter शिवाय कशी मोजाल ऑक्सिजन लेव्हल ? वाचा सोपा पर्याय

पल्स ऑक्सिमीटर आपल्या शरीरातील ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल मोजण्यात मदत करते.

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. या लाटेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड,ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात बेड ऑक्सिजन, इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचप्रमाणे बाजारात ऑक्सिमीटर खरेदी करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक अभ्यासक आणि तज्ज्ञांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ऑक्सिमीटरला महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे सध्या दिल्ली वापरण्यात आलेल्या ऑक्सिमीटर पॅटर्नची खूप चर्चा केली जात आहे. हे पल्स ऑक्सिमीटर किंवा ऑक्सिमीटर काय असते? ऑक्सिमीटरची कोरोना रुग्णांना काय गरज? मात्र ज्यांच्याकडे ऑक्सिमीटर नाहीय त्यांनी त्यांनी ऑक्सिजनची पातळी कशी मोजायची? जाणून घ्या.

ऑक्सिमीटर म्हणजे काय?

ऑक्सिमीटर म्हणजे एक छोटे मशीन असते. जे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी दाखवते. पल्स ऑक्सिमीटर आपल्या शरीरातील ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल मोजण्यात मदत करते. ऑक्सिमीटरला PPO ( Porteble pulse Oxymeter) असेही म्हणतात. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास ऑक्सिमीटरद्वारे लगेच कळते. या कारणामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपल्यापैकी बऱ्याच जणांची घरी ऑक्सिमीटर आणण्यात आला असेल.

ऑक्सिमीटर कसे वापरले जाते?

पल्स ऑक्सिमीटरमुळे लाल रक्तपेशी किती ऑक्सिजन वाहून नेतात हे कळते. रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे का हेही लक्षात येते. पल्स ऑक्सिमीटर सुरु केल्यानंतर त्यात बोट ठेवले जाते. आपल्या बोटावर लाईट पेटते. ही मशीन रक्तातील पेशींचा रंग ओळखून त्याचे निरिक्षण करते. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरी उपचार दिले जातात. या काळात त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी ऑक्सिमीटरद्वारे मोजली जाते. कोरोना काळात घरातील वयोवृद्ध व्यक्तींची ऑक्सिजन पातळी मोजणे ऑक्सिमीटरमुळे सहज सोपे होते.

ऑक्सिजन मोजण्याचा सोपा उपाय

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये डॉ. सोमशेखर यानी ऑक्सिमीटर नसलेल्यांनी ऑक्सजिन मोजण्याचा सोप्पा उपाय सांगितला आहे. ज्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर नाही. त्यांनी आपला तळहात आपल्या छातीवर ठेवून १ मिनिटे आपल्या श्वसनाचा दर मोजावा. श्वसनाचा दर जर २४ पेक्षा कमी असेल तर तुमची ऑक्सिजन पातळी ठिक आहे. जर श्वसनाचा दर २४ पेक्षा कमी असल्यास ऑक्सिजन पातळी मध्यम आहे आणि जर श्वसनाचा दर ३० पेक्षा जास्त असल्यास गंभीर आजार असू शकतो, असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – Sputnik Light ने आणला कोरोनाविरोधी सिंगल डोस, लस ८० टक्के प्रभावी