Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ppf account online: ५०० रुपयात सुरु करा बंद झालेले PPF अकाउंट, काय...

ppf account online: ५०० रुपयात सुरु करा बंद झालेले PPF अकाउंट, काय आहे प्रोसेस ?

Related Story

- Advertisement -

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ हे बचत खाते गुंतवणूकीचा उत्‍तम पर्याय म्हटले जाते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे जी आकर्षक व्याज दर आणि गुंतवणूकीच्या रक्कमेवर परतावा देते. मिळविलेले व्याज (Interest) आणि मिळकत (Returns) आयकर अंतर्गत करपात्र (Taxable) नसते. या योजनेत एखाद्याने पीपीएफ खाते उघडले पाहिजे आणि वर्षभरात जमा केलेली रक्कम कलम 80-C नुसार इन्‍कम टॅक्‍स वजावटीच्‍या दाव्‍यात समाविष्‍ट केली जाईल.

पीपीएफ खाते पुन्हा सुरू करा

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) योजना ही सर्वसामान्यांसाठी खूप उपयुक्त योजना आहे. सध्या वार्षिक व्याज ७.१ टक्के दराने दिले जात आहे, जे बँक मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. 5 वर्षांच्या एफडी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि मुदत ठेव योजनांसारख्या अन्य कर बचत योजनांपेक्षा पीपीएफला अधिक व्याज मिळते. अशा परिस्थितीत, त्यात गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता तसेच अधिक उत्पन्न मिळवू शकता. परंतु जर तुमचे पीपीएफ खाते कोणत्याही कारणास्तव बंद असेल तर ते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. बंद झालेले PPF अकाउंट कसे सुरु करतात पाहू…

५५० रुपयांमध्ये पुन्हा सुरू करा खाते

- Advertisement -

जर पीपीएफ खाते बंद झाले तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जिथे आपण खाते सुरु केले आहेत तिथे जाऊन लेखी अर्ज सादर करावा लागेल. यानंतर, आपले खाते सुरु करण्यासाठी आपल्याला बँक किंवा पोस्ट ऑफिसला अर्ज द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला किमान ५०० रुपये भरण्यासह ५० रुपये दंड द्यावे लागेल.

‘या’ कारणास्तव पीपीएफ खाते होते बंद

तुम्हाला दरवर्षी पीपीएफ खात्यात किमान 500 रुपये भरावे लागतात. त्याचबरोबर आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. जर आपण एखाद्या आर्थिक वर्षात 500 रुपयांची रक्कम भरली नाही, तर आपले पीपीएफ खाते बंद केले जाते. त्यामुळे पीपीएफ खाते किंवा निष्क्रिय झाल्यास आपण ते 15 वर्षाआधी बंद करू शकत नाही. सक्रीय झालेल्या खात्यावर कर्ज घेण्याची सुविधा नाही. मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी बंद केलेली पीपीएफ खाती कायमस्वरूपी बंद केली जाऊ शकत नाहीत.

खाते बंद झाल्यास होणारे नुकसान

- Advertisement -

२०१६ पीपीएफच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यामध्ये सरकारने विशिष्ट परिस्थितीत मॅच्युरिटी होण्यापूर्वी पीपीएफ खाते बंद करण्यास परवानगी दिली आहे. या अटींमध्ये जीवघेणा आजाराच्या उपचारांचा खर्च किंवा मुलाच्या शिक्षणाचा खर्च समाविष्ट आहे.

तिसर्‍या आर्थिक वर्षानंतर पीपीएफ खात्यातील सहाव्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत कर्ज घेता येईल. हा लाभ बंद पीपीएफ खात्यात उपलब्ध नाही. खातेधारकास बंद पीपीएफ व्यतिरिक्त पीपीएफ खाते उघडायचे असल्यास नियम त्यास परवानगी देत ​​नाहीत. कोणत्याही एका व्यक्तीकडे दोन पीपीएफ खाती असू शकत नाहीत.

असे सुरु करा आपले नवीन पीपीए खाते

१) पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वत: च्या नावाने आणि एखाद्या अल्पवयीन मुलासाठी उघडता येते.

२) पीपीएफ खाते उघडण्यासाठी लागणारी किमान रक्कम ५०० रुपये आहे.

३) कोणतीही व्यक्ती पोस्ट खात्यात किंवा बँकेत त्याच्या नावाने हे खाते उघडू शकते.

४) या व्यतिरिक्त, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने दुसरे कोणी खाते देखील उघडू शकते.


 

- Advertisement -