घरCORONA UPDATELockDown: ४ दिवसांत ४ लाख कामगारांचे स्थलांतर; आदित्यनाथ सरकारने हे असं जमवलं

LockDown: ४ दिवसांत ४ लाख कामगारांचे स्थलांतर; आदित्यनाथ सरकारने हे असं जमवलं

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना २८ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत तब्बल ४ लाख कामगारांना दिल्लीतून उत्तर प्रदेशात आणण्यात आले. संचारबंदीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने कामगारांना अखेर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणले कसे, असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला असेल. याबाबतची सविस्तर माहिती समोर आली असून कोरोनाच्या संकटात सर्व नियमांचे पालन करून त्या कामगारांचे स्थलांतर करण्यात आल्याचे उत्तर प्रदेशच्या प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा – पुण्यात कोरोनाचा कहर; यामुळे ७४ हॉटेल्स आणि ३०० शाळा सज्ज!

- Advertisement -

नेमकं घडल असं

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर साधारण १ हजार बसेस पोहोचवण्याचे आदेश २७ मार्च रोजी ९ वाजता दिले. त्यांच्यासोबत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिशकुमार अवस्थीदेखील उपस्थित होते. दिल्लीच्या सीमेवरील परिस्थिती खुपच आव्हानात्मक बनली आहे. लाखोच्या संख्येने तिथे कामगार एकत्र जमले असून त्यान वृद्ध, लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था तिथे नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांची सर्व व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत, असे गृहसचिवांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही वाहतूक सेवा सुरू नसल्याने ती तातडीने उपलब्ध करून देणे कठिण होते. मात्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर लाखोंचा जनसागर उसळला होता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचेही तीनतेरा वाजले होते. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित ठेवणेही गरजेचे होते. मात्र परिवहन सेवेतही केवळ अत्यावश्यक सेवेतील १० टक्केच कर्मचारी उपस्थित असताना इतका मोठा जनसागर वाहतूक करून आणायचा कसा, हा प्रश्न उपस्थित राहिला. तरीही परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांना मध्यरात्री तातडीने कार्यालयात येण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर लोकांना कसे आणले जाईल यावर निर्णय घेतला गेला.

- Advertisement -

२८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता बसेस सीमेवर पाठवण्याचे निश्चित झाले. साधारण २४ तासांत एक हजार बसेस उपलब्ध करण्याचा मानस ठेवला गेला. शिवाय ३ हजार बसेस आणखी उपलब्ध होतील का याचाही विचार करण्यात आला. त्यानुसार सकाळी ८ वाजता तब्बल ६०० बसेस दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर जाण्यासाठी सज्ज झाल्या. दर तासाला १०० बसेस पाठवण्याचे वेळापत्रक बनवले गेले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते. दिल्लीच्या सीमेवरून पहिली बस सोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेच्या मोहन रोड टोल प्लाझावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. २७ आणि २८ मार्च या पहिल्या दोन दिवशी साधारण २ हजार बसेस उत्तर प्रदेशातून सोडण्यात आल्या. मात्र सीमेवर अजूनही मोठ्या संख्येने कामगार उपस्थित असल्याने त्याच्या वाहतुकीकरता ३० आणि ३१ मार्चकरता आणखी ६०० ते ७०० बसेसची मागणी करण्यात आली. असे करून २८ ते ३१ मार्च या चार दिवसात तब्बल चार लाख लोकांना राज्यात परत आणण्यात आले. यासाठी बसेसच्या एकूण ६ हजार ४८९ फेऱ्या झाल्या. सर्व वाहन-चालकांना मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले होते. स्थलांतरीत केलेल्या सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइनही करण्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -