घरदेश-विदेशअखेर अणूयुद्धावर तोडगा

अखेर अणूयुद्धावर तोडगा

Subscribe

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंग जोम आणि अमोरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरी त्यांच्यातील हा वाद पराकोटीला जाऊन, ट्रम्प यांनी उत्तर कोरियाविरोधी युद्धाचा इशारा दिला होता. त्यानंतर किंग जोम यानेही अमेरिकेच्या विरोधात परमाणु क्षेपणास्त्रचा वापर अमेरिकेवर करण्याची धमकी ट्रम्प यांना दिली होती. त्यांच्यातील हा वाद दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत होता. त्यामुळे दोन्ही देशांचे नागरिक चिंतेतूर झाले होते. आण्वस्त्रांचा वापर म्हणजे तिसऱ्या महायुद्धला आमंत्रण, अशी भिती संपूर्ण जगाला वाटत होती. अखेर या युद्धावर तोडगा निघावा म्हणून पुढील महिन्यात दोन्ही देशांनी बैठक आयोजित केली आहे.

शी जिनपिंग यांचा महत्वाचा वाटा
या दोन्ही देशांची बैठक आयोजित करण्यात आली असली तरी या बैठकीचे श्रेय चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना जाते. ‘ब्लूमर्ग’ या आंतरराष्ट्रीय वृत संस्थेच्या बातमीनुसार, उत्तर कोरिया आणि चीन यांच्यात घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे शी जिनपिंग आणि जोम यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. याच मैत्रीच्या आधारावर शी जिनपिंग यांनी जोम यांच्याशी याविषयी चर्चा केली. संयुक्त राष्ट्र संघटनेने उत्तर कोरियाच्या विरोधात काही प्रतिबंध लागू केले होते. त्यानंतर जोम अमेरिकेसोबत बैठकीस तयार झाले.

- Advertisement -

बैठकीतून विषय सुटल्यास चीनला जास्त फायदा
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात बैठक झाल्यास चीन नेहमीच आपल्या समर्थनार्थ मुद्यांचे समर्थन करेल. त्याचबरोबर जोम यांनी अमेरिकेशी बैठक घेण्यास नकार दिला होता. यामुळे ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला अमेरिकेविरोध भडकवत असल्याचा आरोप चीनवर केला. त्यामुळे शनिवारी ट्रम्प यांनी चीनशी चालणाऱ्या व्यापाऱ्याला पुर्णविराम देण्याची घोषणा केली होती. परंतू, आता या बैठकीतून हा व्यापार पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत.

युद्ध झाल्यास चीनचे सर्वाधिक नुकसान
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात युद्ध झाले तर उत्तर कोरियाच्या सत्तेत परिवर्तन होऊ शकते. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते. त्याचबरोबर युद्ध झाल्यास चीनच्या सीमेर्षेवरही अमेरिकेचे सैन्य तैन्यात करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, सर्वात जास्त नुकसान चीनचे होणार आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -