घरदेश-विदेशजाहिरातीमुळे हृतिक रोशन वादाच्या भोवऱ्यात; पुजाऱ्यांकडून माफीची मागणी

जाहिरातीमुळे हृतिक रोशन वादाच्या भोवऱ्यात; पुजाऱ्यांकडून माफीची मागणी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन एका नव्या जाहिरातीमुळे वादात भोवऱ्यात सापडला आहे. Zomato या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत हृतिक उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराचा उल्लेख करताना दिसत आहे, ज्यावरून नवा वादाला तोंड फुटले आहे. हृतिकने नव्या जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या झोमॅटोच्या नव्या जाहिरातीत हृतिक म्हणतोय की, मला भूक लागली होती, म्हणून मी महाकालकडे थाळी मागितली. हृतिक रोशनने उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या नावाने केलेल्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. झोमॅटोच्या जाहिरातीत हृतिक अनेक लहान-मोठ्या शहरांची नावे घेतो. यामध्ये एका जाहिरातीत उज्जैनचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये फूड डिलिव्हरी बॉयकडून पॅकेट घेतल्यानंतर हृतिक म्हणतो, ‘माझ्या मनात थाळीचा विचार आला, मी उज्जैनमध्ये आहे, मग थाळी महाकालकडून मागितली. हृतिकच्या या जाहिरातीवर पुजाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे.

- Advertisement -

हृतिकच्या जाहिरातीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाकाल मंदिराचे पुजारी या जाहिरातीला विरोध करत आहेत. याला पुरोहितांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महाकाल मंदिरातून अशी कोणतीही थाळी उज्जैनमध्येही संपूर्ण देशात पोहोचवली जात नसून, केवळ मंदिरासमोरील भागातच भक्तांना ती मोफत दिली जाते, असा मत पुजाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

हृतिक रोशनच्या या जाहिरातीमुळे भक्त नाराज झाले आहे. यामुळे पुजाऱ्यांनी हृतिक रोशन आणि कंपनीने माफी मागावी अशी मागणी केली आहे. या वादावर जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले- ही बाब माझ्या निदर्शनास आली असून आम्ही त्याची चौकशी करत आहोत. हा व्हिडिओ लोकांची दिशाभूल करणार आहे.

- Advertisement -

उज्जैन महाकालच्या पुजाऱ्याने सांगितले की, जी कंपनी देशातील ग्राहकांना व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी करते, त्यांनी ताबडतोब महाकालच्या नावाच्या थाळीने दिशाभूल करणारी जाहिरात थांबवावी नाहीतर पुजारी संघटनेच्या वतीने पोलिसात तक्रार केली जाईल. कंपनीने हिंदूंच्या भावना दुखावल्या असून आमचा त्याला तीव्र विरोध असल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीने माफी मागितली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराही पुजारी संघाने दिला आहे. उज्जैन महाकाल मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनीही ही जाहिरात तथ्य नसलेली आणि दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, महाकाल मंदिरातील भोजनक्षेत्रातच प्रसाद घेता येतो. इथून थाळी कुठेही पाठवली जात नाही.

या वादानंतर हृतिक रोशनच्या अडचणी वाढू शकतात अलीकडेच सोशल मीडिया युजर्सनी आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे समर्थन केल्याबद्दल हृतिक रोशनवर आपला राग व्यक्त केला. अनेकांनी ट्विटरवर बायकॉट विक्रम वेधा ट्रेंड चालवला. आता या वादानंतर यूजर्स हृतिकच्या चित्रपटावर आपला राग काढू शकतात. बॉलिवूड चित्रपटांची अवस्था कोणापासून लपलेली नाही. बायकॉट च्या ट्रेंडमुळे अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत. आता या वादानंतर हृतिक रोशनच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचे काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -