घरताज्या घडामोडीना तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं भान; निघाले फायटिंग बघायला!

ना तोंडाला मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचं भान; निघाले फायटिंग बघायला!

Subscribe

आता या कोरोनाच्या काळात लोकांना कोणत्या भाषेत सांगितलं म्हणजे कळेल हेच आता सरकारला कळत नाहीये. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगच भान राखा, गर्दी करू नका असं आवाहन वारंवार करूनही नागरिक त्याचे बिनधास्त उल्लंघन करताना दिसत आहेत. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. चक्क बोकडांची फाइट पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं अजिबात भानच नव्हतं. कर्नाटकमध्ये ही घटना घडली आहे.

कर्नाटकच्या बिजापूर जिल्ह्यात बोकडांची फाईट सुरू होती. यावेळी तुफान गर्दी झाली. सोशल डिस्टन्सिंग तर नाहीच पण लोकांनी साधं मास्कही यावेळी लावलं नव्हतं. सध्या बाहेर कोरोना आहे याचा विसरच त्यांना पडला होता. कर्नाटकमध्ये सध्या कोरोनाचे १५ हजार २४२ रुग्ण असून २४६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरोनाचे ७०७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

कर्नाटकातील धक्कादायक प्रकार

कर्नाटकात एकीककडे हा व्हिडिओ व्हायरल होत असताना दुसरीकडे कर्नाटकच्या बेल्लारी गावात कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह खड्ड्यात टाकले जात असल्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना खड्ड्यात फेकले जात असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. जनता दल सेक्युलर पक्षाने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओमुळे कर्नाटकमध्ये एकच खळबळ माजली आहे. या घटनेवर काँग्रेस आणि जेडीएसने कर्नाटकमधील सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -