घरदेश-विदेश'हर घर तिरंगा' मोहिमेला उदंड प्रतिसाद; वेबसाइटवर आपलोड झाले तब्बल 5 कोटींपेक्षा...

‘हर घर तिरंगा’ मोहिमेला उदंड प्रतिसाद; वेबसाइटवर आपलोड झाले तब्बल 5 कोटींपेक्षा अधिक सेल्फी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'हर घर तिरंगा'(har ghar tiranga) अभियान देशभरात सुरु केले. ज्याला देशवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. यासाठी एक वेबसाईट सुद्धा तयार करण्यात आली होती. त्या वेबसाईटवर पाच कोटींहून अधिक तिरंग्याचे सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत. 'हर घर तिरंगा' मोहिमेला सोमवारी जनतेने उदंड प्रतिसाद दिला असं भारताच्या सांस्कृतिक मंत्रायलयाकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खूप उत्साहाने साजरा करण्यात आला.(independence day 2022) देशभरातच अनेक उपक्रम राबविले गेले. केंद्र सरकारकडूनही विविध उपक्रम देशभरात राबविले गेले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशवासीयांना घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा'(har ghar tiranga) अभियान देशभरात सुरु केले. ज्याला देशवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. यासाठी एक वेबसाईट सुद्धा तयार करण्यात आली होती. त्या वेबसाईटवर पाच कोटींहून अधिक तिरंग्याचे सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सोमवारी जनतेने उदंड प्रतिसाद दिला असं भारताच्या सांस्कृतिक मंत्रायलयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा – ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा कहर, महाराष्ट्रात 14 ऑगस्टपर्यंत रेड अलर्ट, IMD चा सतर्कतेचा इशारा

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला आवाहन

22 जुलै 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. या संदर्भातील एक निवेदन सुद्धा सांस्कृतिक मंत्रालयाकडून जरी करण्यात आले होते. त्या निवेदनात मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ‘हर घर तिरंगा’ वेबसाइटवर पाच कोटींहून अधिक ‘तिरंगा’ सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी नोडल मंत्रालयाने राबवलेला हा सरकारचा ‘हर घर तिरंगा'(har ghar tiranga)उपक्रम होता जो खूप जास्त प्रमाणात यशस्वी झाला आहे. जनतेने उत्तम प्रतिसाद दिला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम आजपासून सुरू; जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याबाबतचे महत्त्वाचे नियम

जनतेच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे

सेशवासियांच्या मनात देशप्रेमाची आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्रध्वजाप्रति अधिक जागरूकता वाढविण्याच्या हेतूने ‘हर घर तिरंगा’ ही मोहिम संपूर्ण देशभरात राबविण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान राष्ट्र उभारणीची वचनबद्धता म्हणून सर्वत्र भारतीयांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आव्हान करण्यात आले.

हे ही वाचा – ‘त्या’ दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी फडकावला राष्ट्रध्वज; आपलं सगळं काही भारतात म्हणत परतण्याची मागणी

या पूर्वी राष्ट्रध्वज फडकविण्याची परवानगी नव्हती

दरम्यान याआधी भारतीय नागरिकांना काही निवडक आणि विशेष प्रसंग वगळता राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी नव्हती. उद्योगपती नवीन जिंदाल यांनी 10 वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर हा कायदा बदलला. 23 जानेवारी 2004 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयात घोषित करण्यात आले की, राष्ट्रध्वज मुक्तपणे आदर आणि सन्मानाने फडकवण्याचा अधिकार हा भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींचे(pm narendra modi) कौतुक करताना नवीन जिंदाल यांनी प्रत्येक भारतीयाला ‘प्रति दिन तिरंगा’ आपला आदर्श बनवण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा –  …आज अमेरिका भारतीयांसोबत; गांधींचा उल्लेख करत बायडेन यांच्याकडून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -