घरCORONA UPDATEआता 48 तासात कोरोना होणार नष्ट; ग्लेनमार्कने प्रभावी औषध बनवल्याचा दावा

आता 48 तासात कोरोना होणार नष्ट; ग्लेनमार्कने प्रभावी औषध बनवल्याचा दावा

Subscribe

भारतात कोरोना महामारी अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही, सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होतय. त्यामुळे आरोग्य विभागाकडूनही कोरोना नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहे. कोरोना मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अशात नेझल स्प्रेमुळे 48 तासात कोरोनावर मात करता येईल असा दावा ग्लेनमार्क या कंपनीने केला आहे. ग्लेनमार्कच्या चाचणीचा अहवाल द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथ ईस्ट एशिया जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.

या अहवालानुसार, नेझल स्प्रेमुळे भारतातील उच्च जोखील असलेल्या प्रौढ कोरोना रुग्णांतील व्हायरल लोड 94 टक्के आणि 48 तासांत 99 टक्क्यांनी कमी झाला. औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान हे निष्कर्ष समोर आले आहेत. मुंबईस्थित फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क द्वारे नायट्रिक ऑक्साइड नेसल स्प्रे (NONS) वरील अभ्यास भारतातील 20 क्लिनिकल साइट्सवर लसीकरण केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या 306 प्रौढांवर करण्यात आला.

- Advertisement -

चाचणीदरम्यान COVID-19 रूग्णांमध्ये नेझल स्प्रे (NONS) प्लस स्टँडर्ड केअर विरुद्ध प्लेसबो नेझल स्प्रे, स्टँडर्ड केअर या सात दिवसांच्या उपचारांचे मूल्यमापन करण्यात आले. नेझल स्प्रे हा(NONS) सात दिवसांसाठी दोन्ही नाकपुडी दोन स्प्रे म्हणून दररोज सहा वेळा टाकण्यात आला. या चाचण्या डेल्टा आणि ओमिक्रॉन सर्जेसवर करण्यात आल्या.

संशोधनात असे आढळून आले की, NONS प्राप्त करणार्‍या उच्च-जोखीम असलेल्या रूग्णांमधील 24 तासांच्या आत व्हायरल लोडमध्ये लक्षणीय घट झाली, जी उपचारांच्या सात दिवसांपर्यंत टिकून राहिली. NONS सह उपचारानंतर 24 तासांच्या आत व्हायरल लोड 93.7 टक्के आणि 48 तासांच्या आत 99 टक्के कमी झाला.

- Advertisement -

ग्लेनमार्कच्या क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या सीनियर व्हीपी आणि हेड मोनिका टंडन यावर म्हणाल्या की, “मजबूत डबल-ब्लाइंड चाचणीने NONS ची महत्त्वपूर्ण परिणामकारकता आणि उल्लेखनीय सुरक्षितता दर्शविली गेली. या थेरपीमध्ये कोविड-19 व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता आहे, ज्याचा वापर सध्याच्या महामारीच्या अत्यंत संसर्गजन्य टप्प्यात सहजतेने केला जातो. दरम्यान ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून उत्पादन आणि विपणन मंजूरी मिळाल्यानंतर NONS फेब्रुवारीमध्ये FabiSpray या ब्रँड नावाखाली भारतात लाँच करण्यात येणार आहे.

नायट्रिक ऑक्साईड नाकामार्गे कोरोनाला प्रवेश करण्यास प्रतिबंध करतो, यामुळे व्हायरस नष्ट होत त्याच्या स्ट्रेनला रोखतो, म्हणूनच व्हायरसचा लोड नेझल स्प्रे (NONS) सह इतक्या वेगाने कमी होतो, असे निवेदनात म्हटले आहे. व्हायरस बरा होण्यासाठी मध्यवर्ती कालावधी NONS गटात तीन दिवस आणि उपचार सुरू केल्यानंतर प्लेसबो गटात सात दिवसांचा होता.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात सभापतींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोणत्या विधेयकांवरून होणार गदारोळ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -